दुष्काळ निधीसाठी सव्वा लाखाची मदत

By admin | Published: April 26, 2016 02:15 AM2016-04-26T02:15:18+5:302016-04-26T02:15:18+5:30

महाराष्ट्रातून विविध ठिकाणहून आलेल्या नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने पिंपळे गुरव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथमहाराजांच्या उत्सवाची सांगता झाली.

Help for the cause of drought relief | दुष्काळ निधीसाठी सव्वा लाखाची मदत

दुष्काळ निधीसाठी सव्वा लाखाची मदत

Next

पिंपळे गुरव : महाराष्ट्रातून विविध ठिकाणहून आलेल्या नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने पिंपळे गुरव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथमहाराजांच्या उत्सवाची सांगता झाली. भैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने दुष्काळ मदत म्हणून एक लाख व वैयक्तिक नागरिकांकडून एकवीस हजार रुपयांची मदत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीला देण्यात आली.
कुस्त्यांच्या आखाड्याचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी सरपंच चंद्रकांत देवकर, उत्सव समितीचे अध्यक्ष शंकर जगताप, पोपट जगताप, संजय जगताप, राहुल जवळकर, वस्ताद किसन नवले, शांताराम जगताप, तानाजी जवळकर, रमेश काशिद आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्री मुख्य कुस्ती कोल्हापूरचा पैलवान नंदू आबदार व पैलवान साईराज रानवडे यांच्यामध्ये झाली. यामध्ये आबदार यांनी एक लाख अकरा हजार रुपये बक्षिसाची कुस्ती जिंकली. पंच म्हणून नगरसेवक राजेंद्र जगताप, दत्तात्रय कंद, तुकाराम जवळकर, अर्जुन शिंदे यांनी काम पाहिले. बाबा निम्हण यांनी निवेदन केले. संयोजन समितीचे खजिनदार शिवाजी कदम, महेश जगताप, पैलवान संतोष कदम, पैलवान श्याम जगताप, पैलवान गणेश काशिद, पैलवान नवनाथ जांभूळकर, पैलवान नीलेश गांगार्डे, पैलवान गणेश कदम, माऊली कदम, सुनील देवकर, माऊली जगताप आदींनी संयोजन केले.(वार्ताहर)

Web Title: Help for the cause of drought relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.