वेल्ह्यातील कोविड केअर सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:10 AM2021-05-14T04:10:00+5:302021-05-14T04:10:00+5:30
शिवाजी शिंदे म्हणाले की, तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण (कोविड केअर सेंटर) ग्रामीण रुग्णालय वेल्हे तसेच रानवडी रुग्णालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या ...
शिवाजी शिंदे म्हणाले की, तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण (कोविड केअर सेंटर) ग्रामीण रुग्णालय वेल्हे तसेच रानवडी रुग्णालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योग समूह यांच्याकडून मदत येत आहे. पुणे येथील कोविड वॉरियर्स पुणे यांच्याकडून मदत केली जात आहे. यामध्ये वेल्हे ग्रामीण रुग्णालयासाठी २५ ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहे. याची एकूण किमत तीन लाख ७५ हजार रुपये आहे. यासाठी पुण्यातील ५३ लोकांनी मदत केली आहे. वॉरियर्सचे काही सदस्य या वेळी उपस्थित होते. तसेच तालुक्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेडकर यांच्या पुढाकाराने रामकृष्ण उद्योग समूहाचे संतोष शेंडकर, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर यांच्याकडून रुग्णालयासाठी स्वच्छता साहित्य बेडशीट, सॅनिटायझर, मास्क आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, डॉ. जितेंद्र जाधव, डॉक्टर शैलेश सूर्यवंशी, गणेश जागडे, दीपक धुमाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच आपल्या स्वतःचा वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड केअर सेंटरला एक हजार फेसशिल्ड सामाजिक कार्यकर्ते नाना पिलाने यांनी वाटप केले. या वेळी अनिकेत सोनवणे, राजेंद्र रणखांबे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
१३ मार्गासनी