ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी सेवाभावी संस्थेकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:54+5:302021-08-12T04:14:54+5:30
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका चिपळूण येथे गेले पंधरा दिवसांपूर्वी पाऊस व महापुराने घातलेल्या धुमाकुळामुळे येथील संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊन गेले. ...
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका चिपळूण येथे गेले पंधरा दिवसांपूर्वी पाऊस व महापुराने घातलेल्या धुमाकुळामुळे येथील संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊन गेले. अशा हतबल झालेल्या कुटुंबांना, मदतीचा हात म्हणून पुणे जिल्ह्यातील ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी सेवाभावी संस्था पुणे या संस्थेतील संचालक वारकरी मंडळींनी एकत्रित येऊन मदतकार्य सुरू केले आहे.
चिपळूण व परिसरातील शंकरवाडी, मुरादपूर व खंदाट येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक किराणा वस्तूंचे किट या ठिकाणी वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मल्हारी बापू गावडे (वाडेबोल्हाई), आनंद महाराज तांबे(श्रीक्षेत्र थेऊर), सहखजिनदार विलास दादा उंद्रे (कोलवडी), निवृत्ती महाराज गलांडे (वडगाव शेरी), तात्यासाहेब महाराज हरगुडे (केसनंद), सरपंच उमरोली विजय भडवलकर, उमरोली उपसरपंच संकेत खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते माऊली धुमाळ, विशाल सोनवणे, अजय लोंढे उपस्थित होते.