पत्नीच्या मदतीने पतीनेच केला प्रियकराचा खून, तिला विश्वासात घेऊन रचला होता प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 06:57 PM2021-04-28T18:57:43+5:302021-04-28T18:58:23+5:30
लग्न झाल्यावरही प्रियकर पत्नीला येत असे भेटायला
राजगुरुनगर: प्रियकराचा प्रेयसीनेच नवऱ्याच्या मदतीने खुन केल्याची घटना उघडकिस आली आहे. महेश वसंत लोहकरे (वय २६ ) रा.गोळी कारखाना समतानगर ता.खेड असे खून झालेल्या प्रियकराचे नांव आहे. याबाबत पोलिसांनी पती पत्नीला दोघांना अटक केली आहे.
महेश लोहकरे यांचे भरत भोरू ढोंगे रा. आव्हाड ( ता. खेड ) यांच्या पत्नीबरोबर पुर्वीपासून प्रेमसंबध होते. ढोंगे बरोबर लग्न झाले तरी लोहकरे यांचे ढोंगे यांच्या पत्नीकडे व घराकडे येणे जाणे सुरूच होते. या दोघांचे काहीतरी प्रेमप्रकरण सुरू यांचा संशय भरत ढोंगे याला आला होता. ढोंगे यांने पत्नीला विश्वासात घेऊन हा प्रकार थांबव असे सांगितले होते. या कारणावरून पती पत्नीत भांडणे झाली होती. तसेच लोहकरे याला दोन वेळा ढोंगे यांने मारहाण केली होती. लोहकरे यांचा काटा काढण्याचा प्लॅन ढोंगे यांने पत्नीला विश्वासात घेऊन रचला होता.
३ एप्रिलला लोहकरे हा महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर भरत भोरू ढोंगे याने त्याची बायको पुष्पाबरोबर महेश लोहकरे याचे अनैतिक संबंध आहेत. अशा संशयावरून त्याचा घातपात केला असावा. अशी ६ एप्रिलला खेड पोलिस ठाण्यात मुलांची आई वंदना वसंत लोहकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले होते. यावरुन खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार अंकुश मिसाळ, योगेश भंडारे यांनी तपास सुरू केला. प्रत्येकाचे फोन लोकेशन यांचा तपास करत लोहकरे यांच्या घरच्यांना विश्वासात घेत तपास सुरू केला. ढोंगे यांची पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेऊन उलट तपासणी केली असता, ती घाबरलेली आढळून आली. पोलिसांना संशय येताच पती ढोंगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
पोलिसांनी ढोंगे याला सांगितले तुझ्या पत्नीने सर्व काही खरे सांगितले आहे. आम्हाला तु लवकर सांग काय खरे ते खोटे असा पोलिसी खाक्या दाखवल्या. त्याने लगेच लोहकरे यांचा खुन केल्याची कबुली दिली. लोहकरे याला राजगुरूनगर बसस्थानक समोर माझ्या पत्नीने एका रुममध्ये कोंडून घेतले. दरम्यान मला फोन करुन सांगितले. मी व पत्नीचा भाऊ, व एका मित्राच्या मदतीने लोहकरे याला मारहाण केली. तसेच त्याला गाडीत बसवून पत्नीच्या आईवडिलासमोर माफी माग असे सांगुनआंबेगाव तालुक्यातील घनदाट जंगलात नेऊन लोहकरे याला झाडाला फाशी दिली. त्याचा मुत्यदेह गोहे (ता आंबेगाव )येथे आरोपीच्या घरापासून ३ किलोमीटर अंतरावर जमिनीत पुराला पोलिसांनी ढोंगे व त्यांची पत्नी यांना अटक केली आहे. पुढील तपास खेड पोलिस करित आहे.