माळीण ग्रामस्थांकडून तळीये, कोंढारी गावांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:18+5:302021-07-30T04:10:18+5:30
अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शेतीची बांध, बंदिस्ते, भातपिके, रस्ते व पूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची ...
अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शेतीची बांध, बंदिस्ते, भातपिके, रस्ते व पूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्याच्या पाहणी दौरा केला. या वेळी आहुपे खोऱ्यातील आदिवासी बांधवांच्या विविध अडचणी समजून घेण्यासाठी माळीण येथील कृष्णा यशवंत भालचीम महाविद्यालयामध्ये बैठक घेतली. या वेळी माळीण ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ हजार रुपयांचा धनादेश वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
या वेळी माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, सदस्या इंदूबाई लोहकरे, सरपंच हौसाबाई असवले, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, मधुअप्पा बोऱ्हाडे, उपसभापती संजय शेळके, आहुप्याचे सरपंच रमेश लोहकरे, शंकर मुदगुण, सावळेराम लेंभे, सुहास झांझरे, दिगांबर भालचीम, प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील, तहसीलदार रमा जोशी आदी उपस्थित होते.
२९ तळेघर माळीण
दिलीप वळसे-पाटील यांना मदतीचा धनादेश देताना माळीण ग्रामस्थ.