कोरोनाग्रस्त शिक्षिकेच्या मदतीसाठी इतर शिक्षकांकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:43+5:302021-05-19T04:09:43+5:30
सुनीता निमसे यांना ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून तब्बल ५० हजार रुपयांचा मदत निधी जमा केला. शाळेचे इतर सर्व शिक्षकांनी २५ ...
सुनीता निमसे यांना ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून तब्बल ५० हजार रुपयांचा मदत निधी जमा केला. शाळेचे इतर सर्व शिक्षकांनी २५ हजार रुपयांचा निधी जमा केला. त्यांच्या मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन केल्यामुळे त्याव्दारे थेट त्यांच्या बँक खात्यावर २५ हजारांची रक्कम जमा झाली. त्याशिवाय संस्थेच्या पश्चिम विभागातील रयत सेवक व इतर हितचिंतकांकडूनही २० हजार रुपये जमा करण्यात आले. तर निमसे यांनी यापूर्वी काम केलेल्या आंबेगाव तालुक्यातील संस्थेच्या नरसिंह विद्यालयातील सेवकांच्या वतीनेवतीने २० हजार रुपयांचा मदत निधी दिला, अशी माहिती ही प्राचार्य अजित अभंग व सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे यांनी दिली.
सुनीता निमसे या शिक्षिका पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील रहिवासी असून, सध्या त्यांना अहमदनगर येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या कवठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हिंदी विषयाच्या हंगामी शिक्षिका म्हणून काम करीत आहेत. त्याच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे.