तळेघरमध्ये मुले दत्तक घेणाऱ्या पालकांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:29+5:302021-07-31T04:12:29+5:30
तळेघर : आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या पूर्णपणे अनाथ व कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी त्यांचा ...
तळेघर : आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या पूर्णपणे अनाथ व कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी त्यांचा सांभाळ करणाऱ्या पालकांना वर्षभरासाठी रेशनिंग (किराणा) देण्यात आले. फुलवडे, डिंभे, कानसे येथील कुटुंबांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. प्रत्येक तीन महिन्यांनी या कुटुंबाला त्यांची गरज लक्षात घेऊन मदत केली जाणार आहे, अशी माहिती दत्तात्रय वाळुंज यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रय वाळुंज, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या चार शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेली पंचाहत्तर मुले दत्तक घेतली आहेत. या सर्व मुलांना ते शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षी करत असतात. या उपक्रमाची दखल घेऊन मागील महिन्यात पुणे येथील आशिष समर्थ व गीता समर्थ यांनी या उपक्रमाची दखल घेऊन या मुलांच्या घरी स्वतः भेट देऊन माहिती घेतली होती. त्या वेळी या मुलांना शैक्षणिक साहित्याबरोबर वर्षभर पुरेल एवढे सगळे किराणा (रेशनिंग) देण्याची संकल्पना मांडली व प्रत्यक्षात यानुसार या कुटुंबाला हे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी गभालेवाडी येथील प्रतीक बबन गभाले, सानिका बबन गभाले, प्रतीक्षा बबन गभाले, नंदकरवाडी येथील वेदांत नवनाथ घोटकर, अनुज नवनाथ घोटकर या सर्व अनाथ मुलांना तसेच कानसे येथील अजय विकास वाळुंज, ओंकार विकास वाळुंज या कोविडमुळे पालकत्व गमावलेल्या मुलांना तसेच प्रथमेश शाम आर्य, अपंग मुलांना व त्यांच्या कुटुंबाला हे साहित्य घरी जाऊन देण्यात आले.
या वेळी सागर कोकणे, ज्योत्स्ना माशेरे, सुजय वाळुंज, सुभाष जंगले, एकनाथ डामसे, दिलीप भारमळ उपस्थित होते.
फोटो ई मेल करत आहे.
--
फोटो ३०तळेघर मुले दत्तक
फोटो ओळी : मुलांना किराणा साहित्याचे वाटप करताना दत्तात्रय वाळुंज व सहकारी.