रोबोट यंत्राच्या मदतीने पाणीगळती रोखणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:16 AM2019-01-25T01:16:33+5:302019-01-25T01:16:40+5:30
शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पुणे महापालिकेकडून अत्यंत आधुनिक यंत्रांचा वापर सुरू केला आहे.
पुणे : शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पुणे महापालिकेकडून अत्यंत आधुनिक यंत्रांचा वापर सुरू केला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवार (दि.२४) रोजी निलायम चित्रपट गृहाजवळील परिसरात रोबोट यंत्राच्या मदतीने पाणीगळती शोधण्याचे काम सुरू केले.
पाण्याची गळती शोधाणारे हे मशिन जलवाहिनीमध्ये सोडल्यानंतर ते दोन्ही बाजूंच्या एक किलोमीटर पर्यंतची गळती शोधत आहे. या गळतीचे फोटो काढले जात आहेत. शहरात सध्या पाण्याची ३५ ते ४० टक्के गळती होत असून, लवकरच ही गळती अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून १५ ते २० टक्के कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या अत्याधुनिक यंत्राद्वारे सध्या निलायम चित्रपटगृहाजवळील भागात पाणीगळती तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या यंत्राच्या मदतीने शहरात सर्व ठिकाणी होणारी पाणीगळती शोधणे व ती रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व्ही.जी. कुलकर्णी यांनी दिली .