यादीत नसलेल्या कष्टकरी वर्गालाही द्यावी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:16+5:302021-04-24T04:10:16+5:30
पुणे : कोरोना निर्बंधांत ज्यांना मदत जाहीर केली त्याशिवायही आणखी बराच मोठा कष्टकरी वर्ग आहे, त्यांना मदतीपासून वंचित ठेवू ...
पुणे : कोरोना निर्बंधांत ज्यांना मदत जाहीर केली त्याशिवायही आणखी बराच मोठा कष्टकरी वर्ग आहे, त्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या श्रमिक विकास संघटनेने केली. टेम्पोचालक, त्यांचे मदतनीस, अनोंदीत बांधकाम मजूर, घर कामगार असा एक फार मोठा वर्ग सरकारी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे म्हणणे आहे. संघटनेच्या वतीने अशा असंघटित कामगारांच्या नोंदी केल्या आहेत. आवश्यकता असेल तर यासाठी सरकारला सहकार्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे. संघटनेच्या टेम्पो चालक विभागाचे पदाधिकारी मनोज मोहिते म्हणाले, की लॉकडाऊन, त्यानंतर आता निर्बंध यामुळे या सर्व वर्गाचा व्यवसाय पूर्णतः बुडाला आहे. त्यामुळे त्यांना या मदतीपासून बाजूला ठेवणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना यासंदर्भात निवेदन पाठवल्याची माहिती थोरात यांनी दिली.