मंचर येथे लसीकरणासाठी नागरिकांना हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:53+5:302021-05-10T04:10:53+5:30
मंचर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात सुहास बाणखेले यांनी म्हटले आहे की त्यांचे मित्र समीर सुदाम घेवडे हे दुपारी सव्वा ...
मंचर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात सुहास बाणखेले यांनी म्हटले आहे की त्यांचे मित्र समीर सुदाम घेवडे हे दुपारी सव्वा बाराच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे लसीकरणाबाबत चौकशीसाठी गेले. त्यांच्या निदर्शनास आले की उपजिल्हा रुग्णालय येथे येणारे बहुतेक लाभार्थी हे पुणे शहरातील आहेत. त्यांनी लसीकरणाबाबत बुकिंग हे पुणे शहरातून केलेले आहे. सदर ऑनलाइनची लसीकरणाची माहिती त्यांना टेलिग्राम मेसेंजर नावाच्या ॲपमध्ये मिळते. ठराविक ग्रुपमध्ये जिल्ह्यातील कोणत्या रुग्णाचा स्लॉट कधी ओपन झाला याबाबत त्वरित मेसेज येतो. सदर मेसेजद्वारे पुणे शहरातील व्यक्ती ऑनलाइन लसीकरणाबाबत बुकिंग करत आहेत. तसेच काही व्यक्ती त्रयस्थ व्यक्तीकडून बुक करून एसएमएसऐवजी त्यांच्याकडून आलेले बुकिंगचे सर्टिफिकिट हे व्हाॅट्सअॅप मेसेजवर दाखवून याचे बुकिंगचे प्रमाण ९० टक्केपेक्षा जास्त आहे. यामुळे आंबेगाव तालुक्यातील तसेच स्थानिक लाभार्थींना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येत नाही. कोविन ॲपमध्ये रजिस्ट्रेशन तालुक्यातील नागरिकांसाठी उपलब्ध होतच नाही. लसीकरण उपलब्ध होत नाही. हे सर्वजण लसीकरणापासून वंचित राहत आहे. अनेक नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र त्यांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. तरी याबाबत योग्य ती चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुहास बाणखेले यांनी केली आहे.