मदत करणे ही संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:32 AM2017-08-02T03:32:48+5:302017-08-02T03:32:48+5:30

मदत करणे ही आपली संस्कृती आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्यामध्ये पुणे नेहमी अग्रेसर असते, असे मत ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सोमवारी व्यक्त केले.

Helping the culture | मदत करणे ही संस्कृती

मदत करणे ही संस्कृती

Next

बिबवेवाडी : मदत करणे ही आपली संस्कृती आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्यामध्ये पुणे नेहमी अग्रेसर असते, असे मत ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सोमवारी व्यक्त केले.
स्वारगेट परिसरातील दादावाडी जैन मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गुजरात व राजस्थान येथे आलेल्या भंयकर पुरामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे प्राण गेले आहेत. पुणे पांजरपोळ गोशाळेच्या राजस्थान येथील शिरोही जिल्ह्यातील पथमेडा येथील एक लाखांहून अधिक गायी असलेल्या गोशाळेला ५५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दर्डा यांच्या हस्ते सुपूर्द केला. उद्योगपती ओमप्रकाश रांका, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस. के. जैन, राजेश सांकला, नगरसेवक प्रवीण चोरबेले, पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष श्रीधर पित्ती, पृथ्वीराज बोथरा, अचल जैन, संदीप संघवी, वास्तुपाल रांका, अभय बोथरा, भवरलाल जैन, सतीश शहा, शरद शहा, अनिल गेलडा, उमंग पित्ती, शांतीलाल कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
दर्डा म्हणाले, ‘‘कोणत्याही सामाजिक कार्यात सर्व सामाजिक संस्थांच्या सोबत लोकमत समूह कायम उभा आहे. ‘लोकमत’ म्हणजेच लोकशक्ती आपल्या सोबत आहे. भगवान महावीरांचा जीवदया हा सिद्धांत आहे. त्याचे अनुकरण करत पांजरपोळ संस्थेने केलेली मदत पुण्याची मान उंचावणारी आहे.
राजेश साकला म्हणाले, ‘‘पांजरपोळ संस्थेने केलेली मदत म्हणजे एका गाईने दुसºया गाईला केलेली मदत आहे. यापासून प्रेरणा घेऊन पुण्यातील विविध व्यक्ती, सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे.
ओमप्रकाश रांका म्हणाले, पुणे पांजरपोळ ट्रस्टची स्थापना १८५५ मध्ये झाली होती. या संस्थेमध्ये दीड हजार गाई आहेत. कत्तलीसाठी नेलेल्या गाई सोडवून पांजरपोळमध्ये ठेवल्या जातात. ही देशातील उत्तम गोशाळा असून येथे गार्इंची उत्तम प्रकारे देखभाल घेतली जाते. गाई सांभाळणे अवघड आहे. मात्र तिचे संस्कृतीमधील महत्त्व लक्षात घेता, हे कर्तव्य प्रत्येकाने केले पाहिजे.

Web Title: Helping the culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.