भैरवनाथ संस्थेकडून समाजाला कायम मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:29+5:302021-03-26T04:11:29+5:30
--- मंचर: सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या भैरवनाथ पतसंस्थेने समाजासाठी गरज पडेल तेव्हा मदतीचा हात दिला आहे. पतसंस्थेने तीनशे कोटी ...
---
मंचर: सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या भैरवनाथ पतसंस्थेने समाजासाठी गरज पडेल तेव्हा मदतीचा हात दिला आहे. पतसंस्थेने तीनशे कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला असून दोन वर्षांत पाचशे कोटी ठेवींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
लांडेवाडी-चिंचोडी (ता आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना आढळराव पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू, पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामशेठ गावडे, संचालक कल्पना आढळराव पाटील, सागर काजळे, योगेश बाणखेले, हनुमंत तागड, अभिमन्यू लांडगे, भिकाजी बोकड, अशोक गव्हाणे, शोभा आवटे आदी उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले की, गेली वर्षभर कोरोना साथीचा फटका सर्वांनाच बसला असून या संकटातून बाहेर जाण्याचा प्रयत्न आपण करतो आहे.
नियम पाळावेत तसेच ज्येष्ठांनी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन आढळराव पाटील यांनी केले.
माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, भैरवनाथ पतसंस्थेचे रोपटे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शेतकरी, कामगार यांचे हित जोपासण्यासाठी लावले.पतसंस्थेचे रुपांतर आता वटवृक्षात झाले आहे. सभासदांना बारा टक्के लाभांश देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. प्रास्ताविक करताना संचालक सागर काजळे म्हणाले कोरोना संकट काळातही भैरवनाथ पतसंस्थेची घोडदौड वेगाने सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजवंतासाठी पतसंस्थेने अनेक उपक्रम राबवले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी किसन भालेराव यांनी अहवाल वाचन केले. विभागीय अधिकारी संतोष पाचपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक योगेश बाणखेले यांनी आभार मानले.
---
फोटो क्रमांक : २५मंचर भेरवनाथ पतसंस्था
फोटोखाली: लांडेवाडी चिंचोडी येथील श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील.