पालक गमावलेल्या कुटुंबाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:06+5:302021-07-12T04:08:06+5:30
गेल्या दीड वर्षाच्या करोनाकाळात अनेकांनी आपले आईवडील किंवा दोघांपैकी एक पालक गमावले आहेत. घरात कमावता माणूस गमावल्याने येथील अनेकांच्या ...
गेल्या दीड वर्षाच्या करोनाकाळात अनेकांनी आपले आईवडील किंवा दोघांपैकी एक पालक गमावले आहेत. घरात कमावता माणूस गमावल्याने येथील अनेकांच्या कुटुंबावर उपसमारीची वेळ आली आहे.याची माहिती घेत आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक अनिल सावले यांनी तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील १० लाभार्थी कुटुंबीयांना प्रत्येकी ५ हजारांचा धनादेश देत मदतीचा हात दिला आहे.
वीसगाव-खोऱ्यातील लाभार्थींना घरी जाऊन अनिल सावले युवा प्रतिष्ठान आणि कोसवेल इंडिया प्रा.कंपनीच्या सहकार्याने अधिकारी कदम यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी मार्तंड देव संस्थानचे मुख्य विश्वस्थ सॉलिसिटर प्रसाद शिंदे, सरपंच मंगल गायकवाड, उपसरपंच अंकुश पोळ, सदस्य वैशाली पवार,माजी सरपंच चंद्रकांत नांगरे,आप्पा गोळे जयवंत कोंढाळकर,साहेबराव थोपटे,जयवंत थोपटे अमित दरेकर, गोरख मानकर, दत्तात्रय गरूड,शिवाजी थोपटे,शामराव जेधे,भानुदास थोपटे,सचिन थोपटे, संतोष म्हस्के उपस्थित होते.
धनादेश वाटप करतानाचा अनिल सावले व इतर.