वादळ-वाऱ्यात छप्पर उडालेल्या कुटुंबाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:30+5:302021-06-06T04:08:30+5:30
माॅन्सूनपूर्व वादळी पावसाने चाकणच्या झित्राईमळा येथे राहणाऱ्या बबूताई गोरे यांच्या घराचे छतच वाऱ्यांनी उडून गेले, घराचे नुकसान झाले होते. ...
माॅन्सूनपूर्व वादळी पावसाने चाकणच्या झित्राईमळा येथे राहणाऱ्या बबूताई गोरे यांच्या घराचे छतच वाऱ्यांनी उडून गेले, घराचे नुकसान झाले होते. याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी तलाठी श्रीधर आचारी यांनी पंचनामा केला होता. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ६४ मिलिमीटर पाऊस झाला तरच सरकारी मदत मिळते. पण, पाऊस फक्त २४ मिलिमीटर त्यामुळे सरकारी मदत मिळणार नाही.
बबूताई गोरे या भाजीपाला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वादळाने उडालेल्या घराचे छप्पर टाकण्यासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. स्थानिक माजी नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी सामाजिक भान ठेवून घराच्या छताला नवीन पत्रे दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम गोरे,मोनाली गोरे,विपुल गोरे,राहुल नायकवाडी, शुभम नायकवाडी आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०५चाकण छप्पर उडून गेलेल्यांना मदत
फोटो - वादळी वाऱ्याने उडालेल्या घराचे पत्रे पुन्हा बसवण्यात आले.