काशीकापडे समाजाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:49+5:302021-08-01T04:09:49+5:30
पूरग्रस्तांसाठी "एक हात मदतीचा" या भावनेतून संस्थेच्या वतीने किराणा किटसोबत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ...
पूरग्रस्तांसाठी "एक हात मदतीचा" या भावनेतून संस्थेच्या वतीने किराणा किटसोबत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये किराणा किट, महिलांना सॅनिटरी नॅपकिन, उबदार ब्लॅंकेट, पुरुष, महिला व लहान मुलांना कपडे, रुमाल टाॅवेल, बुट व चपला, पाणी जार, विविध खाद्यपदार्थ, भेळ तयार करण्याचे साहित्य, फरसाण, बिस्किट पुडे, मेणबत्ती, काडेपेटी तसेच आवश्यक ती सर्व औषधे आदींचा समावेश आहे.
संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कुंदेकर, सचिव संतोष जगताप, कोषाध्यक्ष विशाल पवार, महिला आघाडी प्रमुख ललिता भिंगारे, चैत्राली भोसले यांच्यासमवेत दीपक पवार, उमाकांत पालकर, प्रतीक पवार व इतर सदस्यांनी सदर ठिकाणी जाऊन या वस्तू वितरीत केल्या.
सद्यस्थितीत कोरोना महामारीमुळे जीवनमान व अर्थकारण ठप्प झाले असताना कोकणातील बहुतांश गावांवर अतिवृष्टीचे अस्माणी संकट उभे ठाकले आहे.
तेथील परिस्थिती पूर्वपदावर यावी म्हणून शासन आवश्यक ती सर्व मदत करत आहे. परंतु आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून नंदिवाले काशीकापडी समाज संघटनेचे वतीने पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यातून जमा झालेल्या सर्व वस्तू पूरग्रस्तांना देण्यात आल्या आहेत.