विविध उद्योजकांकडून शासनास मदतीचा हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:19+5:302021-04-21T04:11:19+5:30

-- कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगीक क्षेत्रातील क्लीन सायन्स या कंपनीच्या माध्यमातून दौंड तालुक्यात विविध ठिकाणी सुरू ...

Helping hand to government from various entrepreneurs! | विविध उद्योजकांकडून शासनास मदतीचा हात!

विविध उद्योजकांकडून शासनास मदतीचा हात!

Next

--

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगीक क्षेत्रातील क्लीन सायन्स या कंपनीच्या माध्यमातून दौंड तालुक्यात विविध ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना आवश्यक असणाऱ्या बेड, गाद्या, उश्या, चादरी, हँडग्लोज, ब्लॅंकेट, वॉटर डिस्पेन्सर, पीपीई किट, हिटर व अशा प्रत्येक गरजेच्या वस्तू दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे देण्यात आले.

नुकतेच क्लीन सायन्स कंपनीच्या कामगारांची आरटीपीसीआर चाचणी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून आलेल्या कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेसोबतच आरोग्याला देखील प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. कामगारांसाठी वाफ घेण्याचे मशीन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरम्यान, कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील रोटरी क्लब कुरकुंभ एमआयडीसी यांच्या माध्यमातून कोविड चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Web Title: Helping hand to government from various entrepreneurs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.