दशक्रिया विधीचा खर्च टाळून कोविड सेंटरला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:27+5:302021-05-27T04:11:27+5:30
अकरा हजार रुपयांची देणगी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी गावडे म्हणाले की, आरोग्यसेवा हीच ...
अकरा हजार रुपयांची देणगी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी गावडे म्हणाले की, आरोग्यसेवा हीच खरी जनसेवा असून, टिळेकर कुटुंबांनी समाजापुढे मदत करून आदर्श उभा केला आहे. लग्न, वराती, वाढदिवस, दशक्रिया विधी यांवरील खर्चात बचत करून आरोग्य सुविधा निर्माण करण्याची वेळ आली आहे.
या वेळी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, हभप गणेश महाराज शिंदे, हभप गणेश महाराज वाघमारे, सेवानिवृत्त अधिकारी प्रभाकर गावडे, सोसायटी चेअरमन बन्सीशेठ घोडे, महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष सोपानराव भाकरे, चेअरमन दौलतराव भाकरे, प्रकाश भाकरे, सुरेश भाकरे, उपस्थित होते.
हभप कोंडीभाऊ टिळेकर यांच्या स्मरणार्थ कोविड सेंटरला मदत देताना टिळेकर बंधू व राजेंद्र गावडे, प्रभाकर गावडे, सोपान भाकरे व मान्यवर.