नेलेवाडीतील पूरग्रस्तांना ग्रामीण संस्थेचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:13+5:302021-07-29T04:11:13+5:30
पिण्याचे पाण्याचे बाॅक्स, तीन हजार भाकरी, २०० किलो शेंगदाणा चटणी, तीन टन तांदूळ, एक हजार केळी , एक ...
पिण्याचे पाण्याचे बाॅक्स, तीन हजार भाकरी, २०० किलो शेंगदाणा चटणी, तीन टन तांदूळ, एक हजार केळी , एक हजार बिस्किटे पुडे, एक हजार लाईफबाय साबण, तीन हजार मेणबत्ती, काडेपेटी, १०० रग सोडियम अँटीसेप्टीक लिक्विड, २० कँड आदी जीवनावश्यक वस्तू नागरिकांना तातडीने पोहोचविण्यात आल्या. ग्रामीण संस्थेच्या वतीने यापूर्वी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना औषधे, जीवनावश्यक वस्तू, तसेच पुरंदर -हवेली तालुक्यात सलग दोन वर्षांपासून कोविडकाळात गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, सदस्य सुनीता कोलते, मनीषा काकडे, स्वाती होले, डाॅ. सुमित काकडे, अनिल उरवणे, मुन्ना शिंदे, सलील साळुंखे, सचिन नवले, अनिल राऊत, जयेश शिंदे, जावेद आत्तार, रमजान आत्तार, प्रविण महामुनी, बालाजी शिंदे, वैभव शिंदे, मोबीन बागवान, भैय्या महाजन, सोमनाथ होले उपस्थित होते.
२८ सासवड मदत
नेलेवाडी येथील पूरग्रस्तांना ग्रामीण संस्थेच्या वतीने जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले.