उदय ज्योती फाउंडेशनचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:55+5:302021-05-28T04:08:55+5:30
पुणे : कोरोनामुळे रोजगार, कामधंदा बंद पडलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी उदय ज्योती फाउंडेशनच्या वतीने कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ...
पुणे : कोरोनामुळे रोजगार, कामधंदा बंद पडलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी उदय ज्योती फाउंडेशनच्या वतीने कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये गरीब कुटुंबांना अन्नधान्यचे किट वाटप, मानसिक आधार देण्याचे काम केले. फाउंडेशनचे प्रमुख तुषार आडकर व त्यांची टीम हे काम करत आहेत.
सिंहगड रोडवरील अलंकापुरी सोसायटीमध्ये कोरोनाकाळात काहींच्या नोकऱ्या गेल्या, कुणाच्या घरी कर्ता मनुष्य गेला. अशांना एक मदतीचा हात दिला आहे. सामाजिक बांधिलकी राखत ह्या उपक्रमाचे आयोजन ओंकार सदावर्ते आणि त्यांच्या मित्र परिवाराने केले. त्यात प्रामुख्याने दीपक वागळे, विवेकानंद पोटे, नरेश रावडे हे सामील होते. अलंकापुरीमधील सदस्यांनी यथाशक्ती मदत करून ह्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन हा उपक्रम पार पाडला. त्यात अभय देशपांडे, संजय पाटणकर, स्वप्निल पाटणकर आणि अलंकापुरी सदस्य उपस्थित होते.