आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना केली मदत

By admin | Published: December 22, 2016 01:53 AM2016-12-22T01:53:40+5:302016-12-22T01:53:40+5:30

मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणा-या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संख्या राज्यात कमी नाही.

Helping suicide victims | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना केली मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना केली मदत

Next

पुणे : मुला-मुलींच्या लग्नात कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणा-या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची संख्या राज्यात कमी नाही. मात्र, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए)चे मुख्यकार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी आपली कन्या डॉ. प्रियांका आणि कुणाल यांच्या विवाहाच्या खर्चांत बचत करून हा निधी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. राज्यात विविध ठिकाणी प्रमुख म्हणून झगडे यांनी आपल्या प्रशासकीय कामाचा नेहमीच वेगळा ठसा उमटवला आहे. आता त्यांनी अधिकाऱ्यासमोर नवा आदर्श घालून दिला आहे.
झगडे यांची कन्या डॉ. प्रियांका आणि कुणाल यांचा शुभविवाह २० डिसेंबर रोजी केवळ दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत साधेपणाने झाला. लग्नामध्ये कोणत्याही स्वरुपाचा डामडौल न करता हा विवाह पार पडला. यामुळे विवाहासाठी होणारा लाखो रुपयांच्या खर्चात बचत झाली. ही बचत झालेली रक्कम दोन्ही कुटुंबीयाने राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार झगडे यांच्यासह नव दांपत्याने हा निधीचा धनादेश फडणवीस यांच्याकडे दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Helping suicide victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.