ग्रॅविटस फौंडेशनच्या वतीने तृतीयपंथीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:43+5:302021-09-11T04:12:43+5:30

तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक मंजुरीला तीन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हे धान्यवाटप करण्यात आले. ग्रॅविटस फौंडेशनच्या संस्थपिका उषा ...

Helping third parties on behalf of the Gravitus Foundation | ग्रॅविटस फौंडेशनच्या वतीने तृतीयपंथीयांना मदत

ग्रॅविटस फौंडेशनच्या वतीने तृतीयपंथीयांना मदत

Next

तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयक मंजुरीला तीन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हे धान्यवाटप करण्यात आले. ग्रॅविटस फौंडेशनच्या संस्थपिका उषा काकडे यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.

तृतीयपंथीयांच्या अडचणी समजावून घेत त्यांच्याशी संवाद साधत काकडे म्हणाल्या, ‘सर्वच समाजघटकांचा सामाजिक स्तर उंचावत असताना कायमच दुर्लक्षित राहिलेल्या गेलेल्या तृतीयपंथी घटकाला समाजात सन्मानाचे जीवन जगण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. त्यांची समाजातील ओळख नव्याने करून देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ त्यांना ग्रॅविटस फौंडेशनच्या भविष्यात काही उपक्रम हाती घेणार आहे. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे तर या समाजघटकाला खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

तृतीयपंथी कार्यकर्ती सोनाली दळवी म्हणाल्या, ‘सर्वोच्च न्यायालयाने ३७७ कलम रद्द केले असले तरी कायद्यातील तरतुदींपेक्षा आम्हाला समाजाने स्वीकारणे जास्त गरजेचे आहे. नव्या पिढीने स्वावलंबी कसे होता येईल याकडे लक्ष द्यावे.’

Web Title: Helping third parties on behalf of the Gravitus Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.