पुण्यातील अफगाणी नागरिकांसाठी ‘हेल्पलाइन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:20+5:302021-08-17T04:17:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या पुण्यात अफगाणिस्तानातील सुमारे चार हजार विद्यार्थी शिकत आहेत. अफगाणिस्तानातील आणीबाणीमुळे परिस्थितीमुळे त्यांच्यावर मोठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या पुण्यात अफगाणिस्तानातील सुमारे चार हजार विद्यार्थी शिकत आहेत. अफगाणिस्तानातील आणीबाणीमुळे परिस्थितीमुळे त्यांच्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी सरहद संस्थेतर्फे हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातील स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही सुरु करण्यात आला आहे.
अफगाणिस्तान तालिबानच्या अधिपत्याखाली जात असताना तेथील सामान्य माणसांचे जगणे खडतर झाले आहे. येथील विद्यार्थ्यांपैकी अनेकांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. काहींना आर्थिक अडचण, तर काहींना वैयक्तिक समस्यांना सामना करावा लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी मुंबई आणि दिल्लीतील दूतावासांशी संपर्क साधला आहे.
सरहदचे संस्थापक संजय नहार म्हणाले, “पुणे आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या अफगाणी विद्यार्थी आणि नागरिकांना हेल्पलाइनच्या रूपात मदत करण्यासाठी आम्ही हात पुढे केला आहे. सरहद त्यांचे शिक्षण विनाअडथळा चालू ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल. केंद्राच्या मदतीने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधेल. आवश्यक तेथे मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली जाईल. सध्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अफगाणी नागरिकांनी ८००७०६६९०० या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा े्र२२्रङ्मल्ल२ं१ँं@िॅें्र’.ूङ्मे या संकेतस्थळावर संपर्क साधावा.”