महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईनचे कवच!
By admin | Published: June 15, 2015 05:58 AM2015-06-15T05:58:55+5:302015-06-15T05:58:55+5:30
महिलांवरील वाढते अत्याचार, समाजात महिलेला मिळणारी उपक्षितेची वागणूक, लहान मुलीवर तसेच महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, दर दिवसाला ऐकू
Next
प्राची मानकर, पुणे
महिलांवरील वाढते अत्याचार, समाजात महिलेला मिळणारी उपक्षितेची वागणूक, लहान मुलीवर तसेच महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, दर दिवसाला ऐकू येणाऱ्या बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी, राज्य सरकारतर्फे महिलांसाठी १८१ ही हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे.
१८१ ही हेल्पलाईन ही
योजना संकटग्रस्त महिलांसाठी राबविण्यात येणार आहे. या हेल्पलाईनचा लाभ दिल्ली या राज्यातील महिला घेत असून, आता महाराष्ट्र सरकारनेदेखील या हेल्पलाईनचा विचार महिलांच्या संरक्षणासाठी केला आहे. ही योजना राबविणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरणार आहे. हे महिलांच्या प्रश्नासाठी हक्काचे व्यासपीठ असणार आहे.