हेमंत परमार आयर्नमॅन स्पर्धेत कौशल्य आजमावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:02+5:302021-07-30T04:10:02+5:30
गुरुवारी सुहानाचे संचालक, लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया आणि २५ वेळा आयर्नमॅन स्पर्धेत विजेतेपद पटकावणारा कौस्तुभ राडकर यांच्या वतीने परमारला ...
गुरुवारी सुहानाचे संचालक, लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया आणि २५ वेळा आयर्नमॅन स्पर्धेत विजेतेपद पटकावणारा कौस्तुभ राडकर यांच्या वतीने परमारला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी सुहानाचे चेअरमन राजकुमार चोरडिया, सुहानाचे संचालक आनंद चोरडिया, ‘लक्ष्य’चे उपाध्यक्ष आशिष देसाई आणि कौस्तुभ राडकर उपस्थित होते.
या वेळी विशाल चोरडिया म्हणाले की, जेव्हा तुम्ही आपल्या आवडीच्या एखाद्या क्षेत्रासाठी झोकून देता आणि आपल्या ध्येयाकडे टप्प्याटप्याने वाटचाल करता तेव्हा तुम्हाला काहीही अशक्य नसते. परमार यांनी टाकलेले प्रत्येक छोटे पाऊलही त्यांच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरले तसेच अत्यंत कडक दैनंदिन जीवनशैली आणि आरोग्यदायी आहारामुळेच आज इथपर्यंत पोहोचले आहेत. लक्ष्य आणि सुहाना यांनी यापूर्वी अनेक खेळाडूंना सहकार्य केले आहे. तळागाळातील खेळाडूंना त्यांच्या खेळात प्रगती करण्याच्या उद्देशाने लक्ष्य संस्था आम्ही सुरू केली, असे विशाल चोरडिया यांनी सांगितले.
परमार म्हणाले की, जवळजवळ तीन वर्षांहून अधिक काळ कडक आहाराची पथ्ये पाळल्यानंतर गोव्यात झालेली हाल्फ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचे स्वप्न साकारता आले. भविष्यात ही अशा अनेक स्पर्धांमध्ये मी भाग घेणार आहे.
फोटो- हेमंत परमार
फोटो आेळी - परमार यांना शुभेच्छा देताना डावीकडून आशीष देसाई, विशाल चोरडिया, कौस्तुभ राडकर, हेमंत परमार आणि आनंद चोरडिया.