सर्वांना बरोबर घेऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार : हेमंत रासने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:47+5:302021-03-05T04:11:47+5:30

पुणे : महापालिकेचा अर्थसंकल्प १० ते १५ हजार कोटीपर्यंत जाऊ शकेल एवढी क्षमता पुणे शहरात आहे़. त्यामुळे उत्पन्नवाढीसोबतच नागरी ...

Hemant Rasane will try to increase income by taking everyone along | सर्वांना बरोबर घेऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार : हेमंत रासने

सर्वांना बरोबर घेऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार : हेमंत रासने

googlenewsNext

पुणे : महापालिकेचा अर्थसंकल्प १० ते १५ हजार कोटीपर्यंत जाऊ शकेल एवढी क्षमता पुणे शहरात आहे़. त्यामुळे उत्पन्नवाढीसोबतच नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी नवीन पर्याय शोधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे़ या प्रयत्नामध्ये राजकारण बाजूला ठेवून सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्यास हे उद्दिष्ट सहज गाठता येईल, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केला़

सन २०२१-२२ या वर्षीच्या ८ हजार ३७० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकावर गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशी आॅनलाईन सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. त्या वेळी सभागृहातील चर्चेला उत्तर देताना रासने बोलत होते.

अंदाजपत्रकाला पाठिंबा देताना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश अंदाजपत्रकात केल्याचे सांगितले़ आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. अंदाजपत्रकात सुचविलेल्या सर्व योजनांची पूर्तता करून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी नमूद केले.

विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी अंदाजपत्रकावर टीका करताना, मागील चार वर्षांत पालिकेचे उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपयांच्या आसपास राहिले असल्याकडे लक्ष वेधले. उत्पन्न कमी असतानासुध्दा स्थायी समितीने ८ हजार ३७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून नागरिकांची फसवणूक केली आहे. महसुली खर्च वाढत आहे. तर भांडवली खर्चाला प्रशासन चाप लावत असून, त्यांनाही उत्पन्न गोठत चालल्याची जाणीव आहे. परंतु प्रशासनच उसने अवसान आणून आणि महापालिका कर्जबाजारी करून अंदाजपत्रक फुगवत आहे, त्यात स्थायी समितीही हवा भरत असल्याचेही त्या म्हणाल्या़

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी हे अंदाजपत्रक म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची टीका केली. तर माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पीपीपीच्या नावाखाली शहरातील ऐतिहासिक वास्तू विकायला काढल्याचा आरोप केला़

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, आरपीआयच्या गटनेत्या सुनीता वाडेकर, बाबूराव चांदेरे, ज्योती कळमकर, दिलीप वेडे पाटील, कालिंदा पुंडे, सोनाली लांडगे आदींनी अर्थसंकल्पावर मते मांडली़

०००-----------०००

Web Title: Hemant Rasane will try to increase income by taking everyone along

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.