दीप्ती काळेच्या अटकेवरून पती लेफ्टनंट कमांडरांनी केली होती परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:38+5:302021-04-28T04:12:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर घरी जाऊन अटक केल्याप्रकरणी त्यांचे पती लेफ्टनंट कमांडर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर घरी जाऊन अटक केल्याप्रकरणी त्यांचे पती लेफ्टनंट कमांडर श्रीवास्तन रामाणी (निवृत्त) यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ़ एस. जयशंकर यांच्याकडे तक्रार केली आहे़ त्यात त्यांनी दीप्ती काळे यांच्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती.
रामाणी हे कॅनडियन नागरिक असून सध्या ते मोठ्या मुलाकडे कॅनडा येथे वास्तव्याला आहेत. रामाणी हे इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट कमांडर होते. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना पाठविलेल्या पत्रात रामाणी यांनी आपली पत्नी दीप्ती काळे ही लहान मुलासह पुण्याला राहत आहे. यापूर्वी दीप्ती काळे हिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आपण पुणे पोलीस आयुक्तांची २०१९ मध्ये भेट घेऊन पुरावे दिले होते. पोलिसांनी आता तिला अटक केली आहे. पोलीस कोठडीदरम्यान तिच्या जिवाला धोका आहे. आपले कोणी नातेवाईक या प्रसंगी पुण्यात नाही. सध्याच्या कोविडच्या काळात चेन्नईहून नातेवाईकांना पुण्यात येणे अशक्य आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्याने आपल्याशी पत्रव्यवहार करीत असल्याचे रामाणी यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबतची माहिती अॅड. तौसिफ शेख यांनी दिली.
दरम्यान, अॅड. दीप्ती काळे ही पोलीस संरक्षणात असल्याने तिच्या मृत्यूची नियमानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाईल.