महिलेसह तिच्या पतीला रस्त्यात बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:23 AM2017-08-17T01:23:25+5:302017-08-17T01:23:27+5:30

न्यायालयात सुरू असलेल्या वादातून तसेच घराकडे जाणाºया रस्त्यावर ट्रॅक्टर उभा का केला, याचा जाब विचारणाºया महिलेला व तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली.

With her husband, she was beaten in the street | महिलेसह तिच्या पतीला रस्त्यात बेदम मारहाण

महिलेसह तिच्या पतीला रस्त्यात बेदम मारहाण

googlenewsNext

मंचर : न्यायालयात सुरू असलेल्या वादातून तसेच घराकडे जाणाºया रस्त्यावर ट्रॅक्टर उभा का केला, याचा जाब विचारणाºया महिलेला व तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली. महिलेचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना पारगाव शिंगवे येथे घडली. याप्रकरणी १० जणांविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पारगाव येथील भरत प्रकाश ढोबळे हे त्याच्या पत्नीसह एसटी बस स्थानकात उभे होते, त्या वेळी भांडणाचे निमित्त काढून ढोबळे यांनी फिर्यादीच्या पत्नीच्या उजव्या गालावर तीन थापडा मारल्या. थोड्यावेळाने भाऊसाहेब ढोबळे, कुसुम जयराम ढोबळे, मंगल राजाराम ढोबळे, मीरा भाऊसाहेब ढोबळे, पार्वताबाई बाळू ढोबळे, शैला ज्ञानेश्वर ढोबळे, योगेश राजाराम ढोबळे, राहुल भाऊसाहेब ढोबळे, राजाराम पिराजी ढोबळे, प्रवीण राजाराम ढोबळे (सर्व रा. पारगाव) हे सारे तिथे आले. फिर्यादीच्या पत्नीला कुसुम जयराम ढोबळे व मीरा भाऊसाहेब ढोबळे यांनी दुकानातून केस धरून ओढत बाहेर आणले. तिला जबर मारहाण केली. या मारहाणीने ती बेशुद्ध पडली.
ढोबळे पत्नीला त्याच्या ताब्यातून सोडविण्यासाठी गेले असता चौघांनी त्यांनाही मारहाण केली. कुसुम ढोबळे, मीरा ढोबळे, मंगल ढोबळे, शैला ढोबळे यांनी फिर्यादीच्या पत्नीचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्या वेळी सोन्याचे मणी खाली पडले होते, ते वेचून त्यांनी लपवून ठेवले. फिर्यादीचे वडील प्रकाश बाळू ढोबळे हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली. भरत प्रकाश ढोबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १० जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगल माजविणे, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मांजरे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: With her husband, she was beaten in the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.