पुणेकरांनो, इथे जाऊन करा पहिल्या पावसाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:38 PM2018-06-02T16:38:59+5:302018-06-02T16:38:59+5:30
एकदा पाऊस सुरु झाल्यावर सर्वत्र हिरवळ असतेच पण अगदी पहिला पाऊस आल्यावरही प्रसन्न वाटणारी काही ठिकाणे पुण्याजवळ आहेत. तेव्हा या ठिकाणी जाऊन पावसाळ्याला वेलकम करायला हरकत नाही.
पुणे : एकदा पाऊस सुरु झाल्यावर सर्वत्र हिरवळ असतेच पण अगदी पहिला पाऊस आल्यावरही प्रसन्न वाटणारी काही ठिकाणे पुण्याजवळ आहेत. तेव्हा या ठिकाणी जाऊन पावसाळ्याला वेलकम करायला हरकत नाही.
पानशेत :
हिरव्यागार झाडांनी व्यापलेल्या या रस्त्याने पानशेतला जाण्याचा अनुभव कायमच रिफ्रेश करणारा आहे. विशेषतः पावसाळा सुरु होण्यापूर्वीचा नजारा बघण्यासारखा असून वातावरण सुखावणारे आहे. एका दिवसात दुचाकी किंवा चार चाकीवर आरामात जाता येईल असे हे ठिकाण आहे.इथे रस्त्यावर अनेक हॉटेल्स असून थांबून जेवण आणि नाश्ता करता येतो.
लवासा :
लवासा तर बघण्यासारखे आहेच पण भुरभुरत्या पावसात आणि दाटून आलेल्या वातावरणात लवासाच्या घाटात गाडी चालावण्याचा अनुभव भन्नाट आहे. इथे बाहेर तुम्हाला खाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
कामशेत :
कामशेत हा देखील उत्तम पर्याय असून तिथून जवळच भंडारा डोंगर वगैरे भाग बघता येऊ शकतो. तिथून जवळच कार्ले भाजे लेण्यांचा पर्याय उपलब्ध आहे. या ठिकाणी पॅराग्लायडिंग करता येणे शक्य आहे.
फार्महाउस :
आठवडाभर काम करून थकवा आला असेल आणि निवांत आराम करण्याची ईच्छा असेल तर पुणे शहराच्या सर्व बाजूला एक किंवा दोन दिवस जेवणाची, राहण्याची सोय असलेले पर्याय उपलब्ध आहेत. मस्त आराम करत निसर्ग न्याहाळायचा असेल तर इंटरनेटवरून तुम्ही फार्म हाऊस सर्च करू शकता.