पुण्यात इथे मिळते चवदार सॅन्डविच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:46 PM2018-05-10T17:46:21+5:302018-05-10T18:04:09+5:30
चवदार हिरवी चटणी, भरपूर चीज असे पदार्थ घालून केलेले सॅन्डविच बघितले की तोंडाला पाणी सुटते. पुण्यातही अनेक ठिकाणी चवदार सॅन्डविच मिळत असून त्यांची चव आवर्जून घ्यावी अशीच आहे.
पुण्यात इथे मिळतात टेस्टी सॅन्डविच
पुणे : भूक असेल आणि वेळ नसेल तर सर्वोत्तम पोटभरीचा पर्याय म्हणजे सँडविच. जी भाजी टाकू त्यातून वेगळ्या चवीचे सॅन्डविच तयार होते. पण तरी ब्रेड, चवदार हिरवी चटणी, भरपूर चीज असे पदार्थ घालून केलेले सॅन्डविच बघितले की तोंडाला पाणी सुटते. पुण्यातही अनेक ठिकाणी चवदार सॅन्डविच मिळत असून त्यांची चव आवर्जून घ्यावी अशीच आहे.
फ्लेवर्स एफ सी रोड
एफ सी रोडवर खरेदी करणाऱ्याला फ्लेवर्स सॅन्डविच नवीन नाही. इथे आजूबाजूला कपडे विक्री सुरु असल्याने कायम गर्दी असते. मात्र तरीही साधारण १० मिनिटात चवदार सॅन्डविच तुमच्या पुढ्यात येते. इथे मिळणाऱ्या चॉकलेट सॅन्डविचला सर्वाधिक पसंती असते.
सुप्रीम सॅन्डविच
तांबडी जोगेश्वरीच्या बोळीतून तुळशीबागेकडे जायला लागल्यावर रस्त्यात सुप्रीम हे प्रसिद्ध सँडविच मिळते. अतिशय चवदार असे सॅन्डविचचे ७० पेक्षा अधिक प्रकार इथे मिळतात. हव्या त्या भाज्या आणि त्याला कॉम्बिनेशची एकापेक्षा एक सॅन्डविच इथे मिळतात. इथे सॅन्डविच सजवून दिले जात असून मोठ्या माणसासाठीही एक सॅन्डविच पोटभरीचे ठरते.
मारझोरिन
कॅम्पमध्ये कोणालाही विचारले तर मारझोरिन बेकारी सांगितले जाते. इथे मिळणारे चटणी सॅन्डविच केवळ लाजबाब आहे. कमी तिखट, चवदार आणि वर्षानुवर्षे तीच चव राखून असलेले हे सॅन्डविच भरपेट खाल्ले तरी त्रास होत नाही. सॅन्डविचनंतर इथे मिळणारे केक आणि मिल्कशेकही तुम्ही ट्राय करू शकता. पण तरी इथला पीच टी क्लासिक आहे.
गणेश भेळ
गणेश भेळ पुण्यात बहुतांश ठिकाणी असणारे चाट पदार्थ, भेळ आणि सॅन्डविच मिळण्याचे ठिकाण आहे. याच्या अनेक शाखा असून बहुतांश ठिकाणी सॅन्डविच मिळते. इथे मिळणारे चायनिज सॅन्डविच भन्नाट असून चॉकलेट सॅन्डविचही अनेकांच्या पसंतीला उतरते.
सॅन्डविच एक्सपो
कोरेगावपार्क भागातील नॉर्थ रोडवर मिळणारे सॅन्डविच एक्स्पोमधली अनेक सॅन्डविच दिलखुष करणारी आहेत. विशेषतः तिथे मिळणारे चीज चिली ग्रील, कॉर्न सॅन्डविच प्रसिद्ध आहेत. इथे मिळणारे बॉंबे टोस्ट सॅन्डविचही अनेकांना प्रिय आहे.