पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा; तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम, राज्यातही सर्वदूर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:12 PM2017-10-10T15:12:44+5:302017-10-10T15:27:31+5:30

पश्चिम बंगालच्या उपसागरात सोमवारी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे़.

High alert in Bengal; The impact of the severe low-pressure belt, the entire rain in the state | पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा; तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम, राज्यातही सर्वदूर पाऊस

पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा; तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम, राज्यातही सर्वदूर पाऊस

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगाल, हिमालयीन रांगा आणि लगतच्या प्रदेशात अतिवृष्टीचा इशारातीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंडचा उत्तरपूर्व भागात वारे ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहत असून त्यांचा वेग ५० किमीपर्यंत वाढू शकतो़सिक्कीममध्येही पुढील १२ तास जोरदार पाऊस होण्याची शक्यता

पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात सोमवारी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे़ गेल्या ६ तासापासून ते दर तासाला १२ किमी वेगाने वेगाने सरकत आहे़ त्यामुळे पश्चिम बंगाल, हिमालयीन रांगा आणि लगतच्या प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे़ राज्यात मंगळवार व बुधवार सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे़ 
पश्चिम बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे़ त्याचे रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले असून ते सध्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यावर आहे़ 
या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंडचा उत्तरपूर्व भागात वारे ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहत असून त्यांचा वेग ५० किमीपर्यंत वाढू शकतो़ ते हिमालयीन रांगाच्या दिशेने जात असून पुढील २४ तासात हा कमी दाबाचा पट्ट विरुन जाण्याची शक्यता आहे़ या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालचा किनारी प्रदेश, झारखंड, मध्य बिहार या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ यामुळे सिक्कीममध्येही पुढील १२ तास जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे़ 
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा, रायलसिमा या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
त्याचवेळी महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर सिस्टिम तयार झाली असल्याने संपूर्ण राज्यात मंगळवारी आणि बुधवारी पाऊस पडण्याची शक्यता असून काही काही ठिकाणी ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे़ बुधवारनंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले़
 

Web Title: High alert in Bengal; The impact of the severe low-pressure belt, the entire rain in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस