पुण्याच्या कोथरूड भागात शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 10:56 AM2021-12-21T10:56:29+5:302021-12-21T10:56:38+5:30

गव्याला शरीरावर झटापटीत अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या

High Court finds death of wild animal in kothrud area of Pune | पुण्याच्या कोथरूड भागात शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल

पुण्याच्या कोथरूड भागात शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल

Next

पुणे : पुणे शहरातील कोथरूड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात ९ डिसेंबर २०२० साली रानगवा आला होता. काेथरूडमध्ये सुमारे सात तासांपेक्षा जास्त वेळ या गव्याचा थरार सुरु होता. त्याने माणसांच्या जंगलातून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाट सापडली नाही. गव्यासाठी दुर्दैवी ठरलेल्या सात तासांमध्ये नागरिक त्याचे फाेटाे काढत राहिले. माेबाइलमध्ये चित्रिकरण करत राहिले. नागरिकांच्या गाेंगाटामुळे घाबरलेला गवा सैरावैरा धावत राहिला. अखेर वनविभागाने त्याला गुंगीचे औषध देऊन आणि जाळीच्या साहाय्याने ताब्यात घेतले. गव्याला शरीरावर झटापटीत अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. पण उपचारादरम्यान या रानगव्याचा मृत्यू झाला. 

शहरात नागरी वस्तीमध्ये शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूची उच्च न्यायालयाने दखल घेतली असून,महाराष्ट्र वनविभाग आणि पुणे पोलीस आयुक्त यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठविल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये १७ जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 गतवर्षी कोथरूड परिसरात रानगवा शिरल्याची घटना घडली होती. नागरी वस्तीत प्रवेश केल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमा झाली. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात हा रानगवा जखमी झाला. गर्दीला घाबरून गांगरलेल्या गव्याने तिथून निसटण्याच्या प्रयत्नात स्टीलच्या गेटला अंदाधुंद धडका दिल्या आणि त्यातही त्याला थोड्या जखमा झाल्या. शवविच्छेदन अहवालातून हे स्पष्ट झाले की हृदयविकाराच्या झटक्याने या गव्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वनरक्षक दलाचे अधिकारी गव्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘लॉयर्स फॉर अर्थ जस्टीस ’ या वकिलांच्या टीमने ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत डिसेंबर २०२० मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर, तब्बल एक वर्षाने ही याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली.

सात तासांचा झाला होता थरार 

महात्मा सोसायटीपासून साधारण तीन-चार किलोमीटर पळताना आसपासच्या एकाही नागरिकावर गव्याने हल्ला केला नाही. गव्याची धडक खूप जबरदस्त असते. गव्याच्या धडकेत कायमचे जायबंदी करण्याची किंवा वर्मी धडक बसल्यास प्राण घेण्याची ताकद असते. काेथरूडमधल्या सुमारे सात तासांमध्ये गव्याने माणसांच्या जंगलातून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाट सापडली नाही. गव्यासाठी दुर्दैवी ठरलेल्या सात तासांमध्ये नागरिक त्याचे फाेटाे काढत राहिले. माेबाइलमध्ये चित्रिकरण करत राहिले. नागरिकांच्या गाेंगाटामुळे घाबरलेला गवा सैरावैरा धावत राहिला. नागरिकसुद्धा त्याचा पाठलाग करत राहिले आणि नंतर दिवसभर साेशल मीडियातही गवा व्हायरल करत राहिले. 

Web Title: High Court finds death of wild animal in kothrud area of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.