उच्च न्यायालयाची पहिल्यांदाच 'मोक्का' कारवाईला स्थगिती; हॉटेल 'वायकेके'मधील गोळीबार प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:14 PM2021-07-19T19:14:48+5:302021-07-19T19:25:01+5:30

मोक्का प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिलेली ही पहिलीच केस

High Court stay to 'Mocca' action in the firing case at Hotel 'YKK' in Pune | उच्च न्यायालयाची पहिल्यांदाच 'मोक्का' कारवाईला स्थगिती; हॉटेल 'वायकेके'मधील गोळीबार प्रकरण

उच्च न्यायालयाची पहिल्यांदाच 'मोक्का' कारवाईला स्थगिती; हॉटेल 'वायकेके'मधील गोळीबार प्रकरण

Next

पुणे : हॉटेल 'वायकेके'मध्ये जून २०१८ मध्ये पहाटेच्यावेळी गोळीबार झाला होता. यासंदर्भात मार्च २०२१ मध्ये हॉटेल मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दाखल गुन्हयासह मोक्का अंतर्गत केलेल्या कारवाईविरूद्ध आरोपी अजय शिंदे याने वकील सत्यम निंबाळकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही केस घटनेच्या 30 महिन्यांनंतर दाखल करण्यात आली असून,  उशिरा केस दाखल करण्याबाबत कोणतेही कारण देण्यात आलेली नाही. तसेच मुंढवा पोलिसांनी तपास करून कोणताच गोळीबार झाला नसल्याचा शेरा नोंदविला आहे. ही कारवाई उशीरा सूडबुद्धधी आणि राजकीय हेतूने केली असल्याचा युक्तिवाद निंबाळकर यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरीत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुन्हयाच्या तपासाला शनिवारी (दि.१७ ) स्थगिती दिली. मोक्का प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिलेली ही पहिलीच केस आहे.

यासंदर्भात हॉटेलचे मालक विशाल सतीश मोदी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या निलेशचे स्वागत करण्यासाठी हॉटेलचे मालक रिषभ गुप्ता याने वारंवार अनाऊसमेंट केल्याने सचिन पोटे याचा अहंपणा दुखावला गेला आणि त्याने निलेश चव्हाण याच्यावर जीवघेणा हल्ला करून हॉटेलची तोडफोड केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सचिन पोटे, अजय शिंदे आणि त्यांच्या साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या केसमध्ये आरोपींवर मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली. सत्यम निंबाळकर यांनी अजय शिंदे द्वारे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन गुन्हयाच्या तपासावर स्थगिती देण्यात आली आहे. पुणेपोलिसांना या गुन्हयात आरोपींवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. या याचिकेची पुढील सुनावणी 9 सप्टेंबरला होणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: High Court stay to 'Mocca' action in the firing case at Hotel 'YKK' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.