Pune News: एनडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पत्नीसह सासू-सासऱ्याकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 13:58 IST2023-06-17T13:57:32+5:302023-06-17T13:58:15+5:30
याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune News: एनडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पत्नीसह सासू-सासऱ्याकडून मारहाण
पुणे : पती-पत्नीतील कौटुंबिक वादावरून एनडीएतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला त्याची पत्नी, सासू-सासऱ्याकडून डांबून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेजर परिक्षित बिष्णोई (३४, प्रशिक्षक, एनडीए) यांना घरगुती वादातून त्यांची पत्नी शिविका चौधरी, सासू गायत्री सुभाष आणि सासरे सुभाष चंद्रा या तिघांनी मिळून घरात डांबून ठेवले. तसेच बिष्णोई यांना कामावर जाण्यास मज्जाव करत, शिवीगाळ करत मारहाण केली. यादरम्यान तुझी नोकरी घालवू, कोर्ट मार्शल करू, अशी धमकीदेखील दिली. हा प्रकार १७ डिसेंबर २०२२ रोजी घडला. याप्रकरणी मेजर बिष्णोई यांनी तक्रार केली होती, त्यानंतर १५ जून रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उत्तमनगर पोलिस करीत आहेत.