दुसऱ्या हंगामातही राज्यात उच्चांकी दर

By admin | Published: March 27, 2017 02:26 AM2017-03-27T02:26:15+5:302017-03-27T02:26:15+5:30

गतवर्षीप्रमाणे यंदाही माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात एफआरपीपेक्षा जादा दर देऊन राज्यात अग्रक्रमांक

High rate in the state even in the second season | दुसऱ्या हंगामातही राज्यात उच्चांकी दर

दुसऱ्या हंगामातही राज्यात उच्चांकी दर

Next

बारामती : गतवर्षीप्रमाणे यंदाही माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात एफआरपीपेक्षा जादा दर देऊन राज्यात अग्रक्रमांक पटकावला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी दिली.
सन २०१५/१६ च्या गळीत हंगामातील उर्वरित १३८ रुपये प्रतिटनी सभासदांच्या खात्यावर जमा केले. कारखान्याने पहिला हप्तादेखील सर्वाधिक २७५० जाहीर केला. १३४ दिवसांनी कारखान्याचा गळीत
हंगाम संपला आहे. उसाची कमतरता असतानादेखील सभासद आणि गेटकेनधारकांच्या उसामुळे ६ लाख ८७ हजार ९९६ टन गाळप
करण्यात यश आले. या हंगामातील उसासाठी सभासदांना २८५० आणि खोडकी, अनुदानासह ३ हजार रुपयेइतका उच्चांकी दर मिळणार आहे, हा दर राज्यात सर्वाधिक आहे.
या गळीत हंगामात ११.६० इतका सरासरी साखर उतारा राखून ६ लाख, ८७ हजार ९९६ टन उसाचे गाळप केले. ७ लाख ९७ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. या हंगामातील एफआरपीप्रमाणे २३९६ रुपयांचा पहिला हप्ता सभासदांना दिला आहे. कारखान्याच्या सभासदांना खोडकी, अनुदानासह ३ हजार रुपये दर मिळणार आहे. गेटकेनधारकांना २७५० रुपये दर मिळणार आहे.
कारखान्याचे विस्तारीकरण सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्याप्रमाणे शासनाची आणि न्यायालयाची परवानगी घेऊन करण्यात येणार आहे. विस्तारीकरणामुळे परीक्षेतील अतिरिक्त उसाचे गाळप
करण्यास अडचण येणार नाही, यासाठी येणाऱ्या पन्नास टक्के खर्चाची तरतूद कारखान्याने केली आहे. उर्वरित ५० टक्केकर्ज घेणार आहे.
माळेगावच्या उसाच्या दरामुळे स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे शेजारच्या कारखान्यांसह खासगी कारखान्यांना एफआरपीपेक्षा अधिक दर द्यावा लागणार आहे.
विरोधकांकडे हा कारखाना नसता, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जादा दर मिळाला नसता, असे त्यांनी सांगितले. माळेगाव कारखान्याने सहवीजनिर्मिती, स्पिरीट, इथेनॉल, आदी उपपदार्थांचे उच्चांकी उत्पादन केले. त्याबरोबर आॅनलाईन खरेदी पद्धतीमुळे १० कोटी ५० लाख रुपयांची बचत झाली.
माळेगाव कारखान्याच्या कारभाराबाबत अजित पवार सातत्याने सभासदांना दिशाभूल करणारे वक्तव्य करतात. बारामती तालुक्यातील पणदरे येथील कार्यक्रमात पवार यांनी दर किती दिला तरी उसाचे चिपाडे झाले आहेत, अशी टीका केली होती. यापूर्वीदेखील कारखाने अगदी एप्रिलपर्यंत चालले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कारखाने जास्त काळ चालले, तेव्हा उसाचे चिपाडे झाली नाहीत का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी टीका रंजन तावरे यांनी केली. माळेगाववर टीका करण्यापूर्वी त्यांच्या ताब्यातील कारखान्यांकडे असलेल्या फरकाची रक्कम द्यावी, तोपर्यंत माळेगावच्या दराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार अजित पवार यांना नाही.
अजित पवार यांच्या टीकेकडे लक्ष न देता सभासदांच्या हितासाठी कारखाना चालविला. जास्त उत्पादन केले. त्यामुळे अधिकच दर देणे शक्य झाले आहे, असे तावरे यांनी सांगितले. या वेळी अ‍ॅड. जी. बी. गावडे, विजयसिंह गवारे, अविनाश देवकाते, शशिकांत जगताप, जनार्धन झांबरे, प्रमोद गावडे, सुनील सातव, दीपक नवले, चिंतामणी नवले, लक्ष्मण जगताप, जवाहर इंगुले, विलास देवकाते, राजाभाऊ देवकाते, युवराज जाधव, प्रशांत शिंदे, शशिकांत तावरे, धनंजय गवारे, संग्राम काटे, संजय तावरे, अधीक्षक जवाहर सस्ते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

जास्तीचा दर देण्याकडे विशेष लक्ष
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पॅनलचा पराभव करून आमच्याकडे सत्ता दिली. त्यामुळे सभासदांना जास्तीचा दर मिळावा, याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे सन २०१५-१६ च्या हंगामात सर्वाधिक २८०० रुपये दर दिला आहे. त्यातील १३८ रुपये सरकारच्या परवानगीने सभासदांच्या खात्यावर जमा केले. हंगामातील गाळपाला खोडकी अनुदानासह २८७५ रु. दर देणे शक्य झाल्याचे तावरे यांनी सांगितले.

Web Title: High rate in the state even in the second season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.