उच्चशिक्षित तरूणीची फसवणूक

By admin | Published: January 13, 2017 03:11 AM2017-01-13T03:11:25+5:302017-01-13T03:11:25+5:30

बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून दोन भामटयांनी क्रेडीट कार्डची माहिती घेऊन बँक खात्यातून

High school childhood fraud | उच्चशिक्षित तरूणीची फसवणूक

उच्चशिक्षित तरूणीची फसवणूक

Next

पिंपरी : बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून दोन भामटयांनी क्रेडीट कार्डची माहिती घेऊन बँक खात्यातून २ लाख ४० हजार रुपये काढून उच्चशिक्षित तरुणीची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार नुकताच हिंजवडी येथे उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेरणा भटनागर (वय २८, रा. बाणेर रोड, पुणे) यांनी फसवणूक झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांकडे दिली आहे. प्रेरणा यांचे बीटेकपर्यंत शिक्षण झाले असून हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत त्या नोकरीस आहेत. ५ ते ८ आॅक्टोबर २०१६या कालावधीत प्रेरणा कंपनीत असताना त्या केरळ येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. त्यांच्या मोबाइलवर आरोपींनी संपर्क साधला. बँकेतून राहुल आणि अमन उपाध्याय बोलत असल्याचे सांगितले. तिचा विश्वास संपादन केला. के्रडिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ४० हजार रुपये परस्पर काढून घेतले. मोबाइलवर आलेल्या मेसेजमुळे बँक खात्यातील रक्कम कोणीतरी काढली असल्याचे त्यांचे लक्षात आले.आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद त्यांनी हिंजवडी पोलिसांकडे दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: High school childhood fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.