Temperature High: पुणेकर उकाड्याने हैराण; ढगाळ हवामानामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 10:58 AM2022-04-05T10:58:14+5:302022-04-05T10:59:03+5:30
पुणे : गेले दोन दिवस ४० अंशापर्यंत पोहचलेला पारा सोमवारी थोडा खाली आला असला तरी ढगाळ हवामानामुळे वातावरणातील उष्मा ...
पुणे : गेले दोन दिवस ४० अंशापर्यंत पोहचलेला पारा सोमवारी थोडा खाली आला असला तरी ढगाळ हवामानामुळे वातावरणातील उष्मा वाढल्याने उकाड्याने पुणेकर हैराण झाले. पुढील दोन तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार असून रात्रीच्या तापमानात वाढ होणार असल्याने पुणेकरांसाठी दिवसाबरोबरच रात्रही उष्ण राहणार आहे.
पुणे शहरात आज कमाल तापमान ३८.९ आणि किमान तापमान १९.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सरासरीच्या तुलनेत हे थोडे अधिक आहे. असे असले तरी सकाळपासूनच आकाश ढगाळ राहिल्याने वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उष्मा वाढला. घरापासून बाहेर पडल्यावर अंगातून घामाच्या धारा सुरू होत होत्या. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडल्याचे भासत होते.
पुढील काही दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार असून कमाल तापमान ३९ व किमान तापमान २१ ते २२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.