राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुढील परीक्षा ऑफलाईन?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 01:01 PM2022-03-22T13:01:35+5:302022-03-22T13:03:03+5:30
कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या...
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यापुढील परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय काही दिवसात घेतला जाईल, असे सुतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी केले आहे. आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. आरोग्यहिताला प्राधान्य देत ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणात खंड पडू नये, यासाठी ऑनलाईन परीक्षांचा पर्याय निवडण्यात आला.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. यापूर्वीच शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्याच्या यंदाच्या वर्षीच्या पहिल्या सत्राची परीक्षा ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, पहिल्या सत्राच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. मात्र, पुढची सत्र परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची चिन्हे आहेत.