‘जेईई’मध्ये गणिताची काठीण्य पातळी अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:30 AM2018-04-09T05:30:16+5:302018-04-09T05:30:16+5:30
देशभरातील आयआयटी आणि आभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरीवरील जेईई मुख्य परीक्षेत यंदा गणिताच्या प्रश्नांची काठीण्य पातळी अधिक होती.
पुणे : देशभरातील आयआयटी आणि आभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरीवरील जेईई मुख्य परीक्षेत यंदा गणिताच्या प्रश्नांची काठीण्य पातळी अधिक होती. भौतिकशास्त्रात आणि रसायशास्त्रांचे प्रश्न तुलनेने सोपे होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५ ते १० गुणांनी कटआॅफ वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) देशभरात जेईई मुख्य परीक्षा घेण्यात आली. आयआयटी, आभियांत्रिकीसाठी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत, तर आर्किटेक्चर प्रवेशासाठी दुपारी २ ते ५ या वेळेत आॅफलाइन पद्धतीने परीक्षा झाली. एकूण ३६० गुणांची ही परीक्षा होती. गतवर्षी जेईई मे परीक्षेचा कटआॅफ ८१ गुणांवर होता, यंदा हा कटआॅफ ५ ते १० गुणांनी वाढण्याची शक्यता आहे.
प्राइम अॅकॅडमीचे ललित कुमार म्हणाले, ‘भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एक चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर सीबीएसईकडून विचार गेला जाण्याची शक्यता आहे. प्रात्याक्षिकांवर आधारित प्रश्न विचारले गेल्याने, ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे, त्यांना हे पेपर बºयापैकी सोपे गेले.’
>एकंदरीत जेईई मेन परीक्षा अवघड होती. प्रामुख्याने रसायनशास्त्राचा पेपर अवघड होता, तसेच गणिताचा पेपर खूपच वेळखाऊ होता. भौतिकशास्त्राचा पेपरदेखील काही प्रमाणात अवघड होता. हे सर्व पेपर तीन तासांत सोडविणे विद्यार्थ्यांसाठी एक दिव्य होते. गेल्या पाच वर्षांतील हा आतापर्यंतचा सर्वात अवघड पेपर होता.- विनय कुमार, व्यवस्थापकीय संचालक, राव आयआयटी