आठवड्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ शनिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:51+5:302021-02-14T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३३१ रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३३१ रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आठवड्याभरातील ही सर्वाधिक वाढ ठरली आहे. तर, बरे झालेल्या २९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांतील १४२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १ हजार ५५८ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २४५ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात दोन मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७९६ झाली आहे.
दिवसभरात एकूण २९१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ८८ हजार २८६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ९४ हजार ६४० झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ५५८ झाली आहे.
====
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६०७ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १० लाख ६८ हजार ३०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
====
आठवड्यातील रुग्णवाढ
वार कोरोना रुग्ण बरे झालेले रुग्ण
सोमवार १६२ १४५
मंगळवार २१६ १९७
बुधवार २३९ १७०
गुरुवार २५६ ११३
शुक्रवार २५८ ३५०
शनिवार ३३१ २९१