बुधवारी कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:19 AM2021-03-04T04:19:14+5:302021-03-04T04:19:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात बुधवारी झालेली कोरोनाबाधितांची वाढ ही या वर्षातील सर्वांत उच्चांकी ठरली आहे. बुधवारी दिवसभरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात बुधवारी झालेली कोरोनाबाधितांची वाढ ही या वर्षातील सर्वांत उच्चांकी ठरली आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल ८५३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़
दरम्यान, शहरात संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले आहे. अनेक जण खासगी प्रयोगशाळांमधून तपासणी करण्यास मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. सोमवारी दिवसभरात ८ हजार १३ जणांची तपासणी केली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १०.६४ टक्के इतकी आहे. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ५५१ इतकी झाली आहे. दिवसभरात ३८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचवाजेपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ६३० इतकी आहे. शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २८१ इतकी आहे़
शहरात आजपर्यंत ११ लाख ६२ हजार ७९८ हजार जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी २ लाख ४ हजार ६४९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९४ हजार २२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८६९ जणांचा मृत्यू झाला आहे.