९ मार्च २०२० पासूनची कोरोनाबाधितांची सर्वोच्च संख्या गुरुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:23+5:302021-03-19T04:11:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाबाधितांची वाढ सातत्याने होत असून, गेल्या वर्षभरातील सर्वाधिक रुग्णवाढ एकाच दिवसात म्हणजे गुरुवारी ...

The highest number of coronaviruses since March 9, 2020 is Thursday | ९ मार्च २०२० पासूनची कोरोनाबाधितांची सर्वोच्च संख्या गुरुवारी

९ मार्च २०२० पासूनची कोरोनाबाधितांची सर्वोच्च संख्या गुरुवारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची वाढ सातत्याने होत असून, गेल्या वर्षभरातील सर्वाधिक रुग्णवाढ एकाच दिवसात म्हणजे गुरुवारी (दि. १८) आढळून आली आहे. गुुरुवारी दिवसभरात तब्बल २ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २३.२५ टक्के इतकी आहे. त्याचवेळी दिवसभरात ८८५ जण कोरोनामुक्तही झाले.

गुरुवारी शहरातील २२ कोरोनाबाधितांचा, तर शहरात उपचार घेणाऱ्या पुण्याबाहेरील ६ जणांचा मृत्यू झाला. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आजमितीला १६ हजार ८७७ झाली आहे. मात्र, गंभीर कोरोनाबाधितांची संख्या फक्त ४४० असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवसभरात ११ हजार ८३५ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली आहे. सध्या शहरात ८४६ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत.

शहरात आजपर्यंत १२ लाख ८६ हजार ७६१ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख २६ हजार ५४९ जण कोरोनाबाधित आढळून आले. यापैकी २ लाख ४ हजार ६७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या आता पाच हजारांच्या पुढे गेली असून, गेल्या वर्षभरात ५ हजार २ जणांचा बळी कोरोनाने घेतला.

Web Title: The highest number of coronaviruses since March 9, 2020 is Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.