Lonavala Rain: लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद; मंगळवारी २४ तासात तब्बल 275 मिमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:22 PM2024-07-24T12:22:08+5:302024-07-24T12:22:22+5:30

रस्त्यावर जवळपास दीड ते दोन फूट पाणीच असल्याने नागरिकांना या पाण्यामधून वाट काढत प्रवास करावा लागतोय

Highest rainfall recorded in Lonavala As much as 275 mm of rain in 24 hours on Tuesday | Lonavala Rain: लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद; मंगळवारी २४ तासात तब्बल 275 मिमी पाऊस

Lonavala Rain: लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद; मंगळवारी २४ तासात तब्बल 275 मिमी पाऊस

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये यावर्षीच्या सर्वाधिक पावसाचे नोंद आज झाली आहेत मंगळवारी 23 जुलै रोजी 24 तासात शहरात तब्बल 275 मिलिमीटर (10.83 इंच) पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यापासून लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली या दीड महिन्यामधील मंगळवारी झालेला पाऊस हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. मागील गुरुवारपासून (18 जुलै) लोणावळा शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 

सलग आठ दिवस शहरात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी सुरू होत्या रात्री देखील वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे. लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 2601 मिमी (102.40 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज पर्यंत 2503 मिमी (98.54 इंच) पाऊस नोंदवण्यात आला होता. आज देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.
     
 या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नांगरगाव आदर्श सोसायटी समोरील रस्ता, शहाणी हॉलिडे होम समोरील रस्ता, नारायणी धाम समोरील रस्ता, बापदेव मंदिरासमोरील वलवण गावाकडे जाणारा रस्ता, वलवण नांगरगाव रस्ता, बाजारभागातील रस्ते अशा अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. छोटे मोठे नाले हे ओसंडून वाहत असून इंद्रायणी नदीच्या पाणीपात्रात देखील मोठी वाढ झाली आहे. कार्ला, मळवली, सदापुर या भागामध्ये इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरले आहे. देवले ते मळवली या रस्त्यावर जवळपास दीड ते दोन फूट पाणीच असल्याने नागरिकांना या पाण्यामधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.

 

Web Title: Highest rainfall recorded in Lonavala As much as 275 mm of rain in 24 hours on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.