पुणे पदवीधर व शिक्षकसाठी चुरशीची लढत ; दुपारी बारापर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 02:35 PM2020-12-01T14:35:44+5:302020-12-01T15:54:15+5:30

भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेने पदवीधर व शिक्षक निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 

Highest voting in the Kolhapur from division till 12 noon for Pune graduate and teacher elections | पुणे पदवीधर व शिक्षकसाठी चुरशीची लढत ; दुपारी बारापर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूरमध्ये

पुणे पदवीधर व शिक्षकसाठी चुरशीची लढत ; दुपारी बारापर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूरमध्ये

googlenewsNext

पुणे  : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज (दि.१ ) मतदान होत आहे. पुणे पदवीधर साठी भाजपकडून संग्रामसिंग देशमुख महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अरुण लाड व मनसेकडून रूपाली पाटील -ठोंबरे यांच्या चुरशीची लढत होत आहे. जवळपास गेले पंधरा दिवसांपासून या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी एकमेकांवर झाडल्या जात होत्या. भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेने पदवीधर व शिक्षक निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 

कोरोनानंतर राज्यात प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ न देताच राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात कोरोनाचे संकट यामुळे प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली आहे. पुणे विभागातील पाचही जिल्हा हा निवडणुकीचे कार्यक्षेत्र असून, विभागात पदवीधर आणि शिक्षक सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आगोदर मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्यात आली. यामध्ये या शेवटच्या दिवसात अर्ज केलेल्या शंभर टक्के लोकांची नावे मतदार मतदार यादी घेण्यात आली आहेत. ही नावे यादीत समाविष्ट करताना कोणत्याही प्रकारची चाळणी लावली गेली नाही. यामुळे एकाच मतदाराचे नाव दहा,आठ वेळा यादीत आले आहे. दुबार मतदारांची संख्या तर खूपच मोठी आहे. यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता अधिक आहे. 

 पुणे विभागात दुपारपर्यंत पदवीधर साठी१९.४४% पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी शिक्षक- २६.२५ % इतके मतदान करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक मतदानाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आली असून तिथे पदवीधर २८. ३६ टक्के तर शिक्षक २६.२५ टक्के मतदान झाले आहे. 
दरम्यान पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी 232 तर शिक्षक मतदार संघासाठी 125 मतदान केंद्र आहेत. यात सर्वाधिक हवेली तालुक्यात मतदार आणि मतदान केंद्र आहेत. 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक : दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान
पदवीधर - 37.10%
शिक्षक- 54.03%

 मतदार यादी व मतदान केंद्रांचा गोंधळामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार 
 या निवडणुकीसाठी या व परंतु मतदार यादीतील चुका, दुबार ते तब्बल दसबार मतदार, छायाचित्र नसलेले मतदार, नावातील चुका, चुकीचा ओळखपत्र क्रमांक हा मतदार यादीतील गोंधळ कमी असताना मतदान केंद्रांमुळे या गोंधळात अधिकच भर पडली आहे. गोखलेनगरमध्ये राहणा-या मतदाराचे नाव कॅम्पमध्ये धायरीच्या मतदाराचे नाव कात्रजमध्ये कोथरूडच्या मतदाराचे नाव बाणेरमधील मतदान केंद्रावर आले आहे. यामुळे मतदानावर कोरोनाचे सावट असताना प्रशासनाच्या कारभाराचा मतदानाच्या टक्केवारील मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Highest voting in the Kolhapur from division till 12 noon for Pune graduate and teacher elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.