दौंडला गहू पिकाची उच्चांकी पेरणी
By admin | Published: January 24, 2017 01:26 AM2017-01-24T01:26:17+5:302017-01-24T01:26:17+5:30
दौंड तालुक्यात ५ हजार २४८ हेक्टर क्षेत्रावर या वर्षी गव्हाची उच्चांकी पेरणी झाली आहे. तालुक्यातील शिवारात जिकडे-तिकडे गव्हाचे
Next
केडगाव : दौंड तालुक्यात ५ हजार २४८ हेक्टर क्षेत्रावर या वर्षी गव्हाची उच्चांकी पेरणी झाली आहे. तालुक्यातील शिवारात जिकडे-तिकडे गव्हाचे डौलदार, हिरवेगार पीक पाहून आपण दौंडमध्ये नसून पंजाब राज्यात आहोत की काय, असा भास होत आहे.
चालू वर्षी नीचांकी उसाच्या पिकाचे उत्पादन दौंड तालुक्यात आल्याने पयार्याने कमी कालावधीत येणारे पीक म्हणून बळीराजाने गव्हाची पेरणी केली.
कमी काळात हिरवेगार पीक आले असून बहुंताशी गव्हाच्या ओंबीमध्ये पुरेपूर टप्पोरा गव्हाचा दाणा भरला आहे. संकरित व आधुनिक बियाण्यामुळे एका ओंबीमध्ये १०० ते १२० गव्हाचे दाणे भरले असल्याची माहिती शेतकरी माऊली ताकवणे यांनी दिली. (वार्ताहर)