महामार्ग पुणे-सातारा...प्रवासाचे मात्र तीन तेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 06:30 AM2017-08-30T06:30:09+5:302017-08-30T06:30:13+5:30

महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता.

Highway Pune-Satara ... Traveling only three! | महामार्ग पुणे-सातारा...प्रवासाचे मात्र तीन तेरा!

महामार्ग पुणे-सातारा...प्रवासाचे मात्र तीन तेरा!

Next

सूर्यकांत किंद्रे 
भोर : महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, जागोजागी दुभाजक तुटलेले, मोºयांना कठडे नाहीत, नवीन पुलांचे व भुयारी मार्गाचे सर्व्हिस रोडचे रेंगाळलेले काम, दिशादर्शक सूचनाफलक नाहीत यामुळे सततची वाहतूककोंडी आणि वारंवार अपघात होता. मागील एका वर्षात सुमारे ८८ अपघात झाले आहेत. त्यांत सुमारे ४७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्यान प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून अडथळ्यांची शर्यत पार करण्यासारखी अवस्था आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम २००४मध्ये, तर सहापदरीकरणाचे काम २०१०मध्ये सुरू झाले. मात्र, मागील ७ वर्षांपासून शिंदेवाडी ते सारोळ्यादरम्याची रस्ते, सर्व्हिस मार्ग, पुलांची व भुयारी मार्गाची कामे अपूर्ण आहेत. या मार्गावर अपघातांची मालकी सतत सुरू असते. मागील ७ वर्षांत ६६८ अपघातांमध्ये ३४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, तरीही महामार्ग प्राधिकरणाला जाग आली नाही.
महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनेक गावांना जाण्या-येण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असून ती अर्धवट आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वळवली आहे. याबाबतचे सूचनाफलक नाहीत. झेब्रा कॉसिंग नाहीत. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते साताºयादरम्यानच्या १४० किमीच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये ६० मीटरचे भूसंपादन केले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात २००४मध्ये झाली.
काम पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्र ा कंपनीला १७२४ कोटी रुपयांना ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर येथील व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली. या टोलमधून दर वर्षी महामार्ग प्राधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमियम मिळणार आहे. यात दर वर्षी ५ टक्के वाढ होणार.
सदर रोडचे काम २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट होती; मात्र २०१७ संपायला आले तरीही अद्याप काम अपूर्णच आहे आणि काम पूर्ण होण्याआधीच ४० टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास आणि तरीही टोलवाढीचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावा लागत आहे. महामार्गावर अत्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत कामे असल्याने वाहतुकीला अडथळा तर होत आहेच; शिवाय रात्रीअपरात्री लहानमोठे अपघातही होत आहेत.

सूर्यकांत किंद्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क

Web Title: Highway Pune-Satara ... Traveling only three!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.