Pune: चांदणी चौकात हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारणार
By राजू हिंगे | Published: June 21, 2024 08:52 PM2024-06-21T20:52:32+5:302024-06-21T20:53:13+5:30
स्थायी समितीची ६ कोटी ५६ लाखाच्या निविदेला मंजुरी
पुणे : चांदणी चौक येथील बावधन खुर्द सर्वे नंबर १९ आणि २० येथे हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारण्यात येणार आहे. येथे १७ फुट उ उंचीच्या चौथ्यावर तब्ब्ल २० फूट उंचीचा ब्रांझ मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी ५६ लाख रूपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, भवन विभागाचे युवराज देशमुख यांनी ही माहिती दिली. चांदणी चौकाकडून वारजे कडे जाणारा रस्ता आणि मुळशीकडून कोथरूड कडे जाणारा उड्डाणपूल आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या मध्ये ५ हजार ५४२ चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. या जागेत हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारण्यात येणार आहे. या कामासाठी पालिकेने आर्किटेक्ट सतीश कांबळे यांची नेमणूक केली आहे. या प्रकल्पामध्ये स्टोन क्लाउडिंग असलेले प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. कमळाच्या पाकळ्याच्या आकारातील कारंजे त्यामधील अंदाजे १७ फुट उंचीच्या चौथ्यावर २० फूट उंचीचा ब्रांझ मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पिवळ्या व लाल रंगाच्या स्टोन मधील पदपथ , जागेच्या दुसऱ्या बाजूला छोटे प्रवेशद्वार, मिळकतीच्या एका बाजुला आरसीसी रिटेनिंग वॉल ,इतर बाजूस सीमा भिंत उभारली जाणार आहे. उर्वरित जागेत उद्यान विषयक कामे करण्यात येणार आहे .या कामासाठी पालिकेच्या बजेटमध्ये पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या कामासाठी कोणी महापालिकेने निविदा मागवली होती. त्यासाठी ६ कोटी ५६ लाख रूपयांची निविदा आली होती. या या निवेदला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.