जागा संपादनाचा अडथळा, सात-बारा उताऱ्यावरील गुंता, बनला शेतकऱ्यांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:24 PM2019-04-01T23:24:20+5:302019-04-01T23:24:59+5:30
पुणे-खेड महामार्ग : सात-बारा उताऱ्यावरील गुंता, बनला शेतकऱ्यांची डोकेदुखी
राजगुरुनगर : राजगुरुनगर-नाशिक फाटा रस्ता सहापदरी होणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन संपादन प्रस्तावित आहे. रस्त्यासाठी संपादन होणाºया खेड तालुक्यातील नऊ गावांच्या जमिनीच्या सात-बारामधील गुंता आधी सोडवा, अशी मागणी जमीनमालकांनी या पार्श्वभूमीवर केली आहे.
पुणे राजगुरुनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची घनता आणि त्यामुळे होणारी कोंडी हे नेहमीचे आहे. या पार्श्वभूमीवर रस्तारुंदीकरण काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भूसंपादनासाठी गती देण्यात आली आहे. मात्र सात-बारा उताºयावरील गुंता यामुळे जमीनमालकांना मोबदला मिळण्यात मोठा अडथळा येत आहे, याचा फायदा काही अधिकारी व एजंट घेत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
नाशिक फाटा ते राजगुरुनगर (चांडोली) रस्त्यासाठी २००४ मध्ये संपादन झाले, हा रस्ता चौपदरी झाला. कोंडी कमी झाली. टोलवसुलीही तेव्हापासून सुरू आहे. संपादन झालेल्या जमिनीचा मोबदलाही अद्याप काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. नोटिसा आणि सात-बारा यांच्यातील त्रुटींच्या पार्श्वभूमीवर मोबदला देणे आणि भूसंपादन
करणे ही अडथळ्यांची शर्यत
बनली आहे. मागील भूसंपादनाचे
पैसे अजून काहींना मिळाले
नाहीत. देण्यात आलेल्या नोटिसा आणि सात-बारावरील क्षेत्र यांचा
मेळ बसत नाही. वहिवाट व
मालक यांच्यात काही ठिकाणी
मेळ नाही. मोजणीबाबत
खातेदारांचा आक्षेप आहे. फेरमोजणी होऊन मोबदला मागणीनुसार
मिळावा, अशा भूमिकेत शेतकरी आहेत.
सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने प्रस्ताव तयार केल्याप्रमाणे पुणे ते राजगुरुनगर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. याबाबत अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली होती. खेड तालुक्यातून जाणाºया राष्ट्रीय राजमार्गाच्या रुंदीकरणात नऊ गावांतील जमिनी संपादन होणार आहेत. संतोषनगर, वाकी खुर्द, शिरोली, चाकण, चांडोली, चिंबळी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरुळी या गावांच्या जमिनीचा त्यामध्ये समावेश आहे.
शेतकºयांच्या भूमिका
४चौपदरीकरणात संपादन झालेल्या व अनेक वर्षे अडकलेल्या जमिनीचा मोबदला आधी द्यावा.
४सात-बारा, नोटिसा, वहिवाट यांचा योग्य मेळ घालावा.
४सात-बारा उताºयावरील गुंता आधी सोडवावा.
४संबंधितांना सर्व मोबदला मिळाल्याशिवाय संपादन करू नये.