पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; लाखो हिंदू बांधव सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 01:11 PM2023-01-22T13:11:01+5:302023-01-22T14:09:17+5:30

भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक घोषणाबाजी करत मोर्चात सहभागी झाले आहेत

Hindu public protest march in Pune; Millions of Hindu brothers participated | पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; लाखो हिंदू बांधव सहभागी

पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा; लाखो हिंदू बांधव सहभागी

Next

पुणे : छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करण्यात यावा, धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विषयीकडक कायदे करावेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’म्हणून साजरा करावा अशा विविध मागण्यांसाठी पुण्यात हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

रविवारी सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाला सुरूवात झाली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने हा मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचणार आहे. त्याठिकाणी मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चात लाखो हिंदू बांधव सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. भगवे ध्वज, पारंपरिक पोशाखात नागरिक घोषणाबाजी करत मोर्चात सहभागी झाले आहेत. 

 हा मोर्चा सकाळी दहा वाजता या मोर्चाला लाल महालापासून सुरुवात झाली असून डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचणार आहे. या मोर्चात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर भाजपचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही या मोर्चात सहभागी झाले आहेत.

वाहतुकीत बदल 

मोर्चा लालमहाल येथे जमण्यास सुरुवात झाल्यावर फडके हौद चौकाकडून येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.  शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने इच्छितस्थळी जाता येणार आहेत. गणेश रोड- दारूवाला पुलाकडून फडके हौद चौक जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक ही दारुवाला पूल आणि फडके हौद चौकातून इच्छितस्थळी जात आहे. बाजीराव रोड पूरम चौकातून बाजीराव रोडने महापालिकेकडे येणारी वाहतूक ही सरळ टिळक रोडने अलका चौक आणि खंडोजीबाबा चौकातून जात आहे. केळकर रोडने अप्पा बळवंत चौकाकडून जोगेश्वरी मंदिर चौकमार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात आले आहे.

Web Title: Hindu public protest march in Pune; Millions of Hindu brothers participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.