Nitesh Rane: मुसलमान नव्हे तर हिंदूच हिंदूंचे शत्रू; म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय, नितेश राणेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 07:22 PM2024-08-18T19:22:05+5:302024-08-18T19:22:35+5:30
स्वतःसाठी अथवा राजकारण किंवा कोणावर टीका करण्यासाठी येथे आलो नाही, हिंदू म्हणून बोलण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आलो आहे
इंदापूर: वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत या मागणीसाठी आ. राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणेंनी आपल्या येण्याला व सभेला विरोध करणाऱ्यांवर खरपूस टीका केली आहे. मुसलमान हिंदूंचे शत्रु नाहीत, हिंदूच हिंदूंचे शत्रु आहेत म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय. तुम्ही नितेश राणेला नव्हे तर भगव्याला विरोध करता आहात असे ते म्हणाले आहेत.
श्रीराम वेस नाक्यावरील विठ्ठलाच्या मुर्तीपासून नितेश राणे,संग्राम भंडारे पाटील,माऊलीच चवरे,भारत जामदार,किरण गानबोटे,राहुल गुंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहराच्या मुख्य रस्त्याने नगरपरिषदेच्या मैदानावर आल्यानंतर, छ.शिवराय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सभेस सुरुवात झाली.
राणे म्हणाले की,ज्या शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या घराण्याच्या आद्यपुरुषाच्या गढीवर जर अतिक्रमण होत असेल, त्यांचा अवमान होत असेल. तर अशा गोष्टींना विरोध करणार नसू तर आम्हाला महाराजांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न मनात घेवून आपण येथे आलो आहोत. कोणत्या पक्षाचा आमदार वा कार्यकर्ता म्हणून आलो नाही. स्वतःसाठी अथवा राजकारण करण्यासाठी कोणावर टीका करण्यासाठी येथे आलो नाही. हिंदू म्हणून बोलण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आलो आहे. इंदापूरात येवून वातावरण खराब करण्याचा,कायदा सुव्यवस्था बिघडवायची असा ही विषय नाही. आपल्या येण्याला व सभेला विरोध करणारायांवर त्यांनी खरपूस टीका केली. मुसलमान हिंदूंचे शत्रु नाहीत, हिंदूच हिंदूंचे शत्रु आहेत म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय. तुम्ही नितेश राणेला नव्हे तर भगव्याला विरोध करता आहात असे ते म्हणाले. मी काही व्हाईट कॉलर आमदार नाही. जेथे जातो तेथे तयारीनेच जातो.दोन चार जणांना झोपवूनच घरी जायचे त्यांचातला मी आहे. बरे झाले पोलीस आमच्या गाड्या तपासत नाहीत. विरोध करणाऱ्यांच्या डोक्यावर जेवढे केस नसतील ३०७,३५३ च्या केसेस माझ्यावर आहेत असे ते म्हणाले.
मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे दिलेल्या मुदतीत काढून टाकण्यात आली नाहीत तर तुम्ही फार काळ खुर्चीवर रहाणार नाहीत, असा सज्जड इशारा राणे यांनी यावेळी दिला आहे.