सनातनवरील बंदीच्या मागणीचा निषेध करण्यासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा माेर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 05:52 PM2018-08-21T17:52:21+5:302018-08-21T17:54:41+5:30

सनातनवर बंदी घालावी या मागणीच्या विराेधात हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात माेर्चा काढला.

hindutvavadi organizations on road to protest against snatan ban demand | सनातनवरील बंदीच्या मागणीचा निषेध करण्यासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा माेर्चा

सनातनवरील बंदीच्या मागणीचा निषेध करण्यासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा माेर्चा

Next

पुणे : सनातनच्या साधकांवरील खाेटे गुन्हे तसेच सनातन संस्थेवरील बंदीची मागणी मागे घेण्यात यावी यासाठी पुण्यात हिंदू जनजागृती समिती, सनातन तसेच इतर हिंदूत्ववादी संस्थांतर्फे माेर्चा काढण्यात अाला. पुण्यातील महाराणा प्रताप उद्यान चाैकापासून कसबा गणपती मंदिरापर्यंत हा माेर्चा काढण्यात अाला. हातात मागण्यांचे फलक घेत अनेक साधक या माेर्चामध्ये सहभागी झाले हाेते. त्यातही महिलांची संख्या अधिक हाेती. 

    डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे याला अटक करण्यात अाली अाहे. त्याचबराेबर नालासाेपारा येथे वैभव राऊत या सनातनच्या साधकाच्या घरी बाॅम्ब व बाॅम्ब बनविण्याचे साधन सापडल्याने ए टी एस ने त्याला अटक केली अाहे. त्याच्या चाैकशीत शरद कळसकर याचे नाव दाभाेलकरांच्या हत्येप्रकरणी समाेर अाले. तसेच शरद कळसकरकडून सचिन अंदुरेची माहिती तपास यंत्रणांना मिळाली हाेती. त्या अाधारे अंदुरेला अटक करण्यात अाली अाहे. सनातनच्या साधकांवर खाेटे गुन्हे दाखल केले असल्याचे सनातनचे म्हणणे अाहे. हिंदुत्ववाद्यांवरील अन्याय्य कारवाई अाणि सनातनवरील संभाव्य बंदी यांच्या विराेधात हा निषेध माेर्चा काढण्यात अाला हाेता.यावेळी सनातन संस्थेची बदनामी बंद करा, सनातनवरील केलेले अाराेप खाेटे अाहेत, तसेच साधकांवरील अाराेप खाेटे अाहेत. सनातनचे सर्व साधक निर्दाेष अाहेत अशा घाेषणा यावेळी देण्यात अाल्या. 

    या माेर्चाचे कसबा मंदिरासमाेर सभेत रुपांतर झाले. यावेळी दाभाेलकरांची हत्या झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या अात तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभाेलकरांची हत्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लाेकांनी केल्याचे म्हंटले हाेते. त्यांच्या या विधानामुळे दाभाेलकरांच्या हत्येचा तपास भरकटला असल्याचा अाराेप हिंदु जनजागृती समितीचे पराग गाेखले यांनी केला. तसेच विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचाही यावेळी समाचार घेण्यात अाला. त्यांच्या शिक्षण संस्थांमधील भ्रष्टाचार अाम्ही उघडकीस अाणल्याचा दावा गाेखले यांनी केला. सनातनवर खाेटे अाराेप करण्यात येत अाहेत. त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी करण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच देशात हिंदूवर हाेणारा अत्याचार सहन केला जाणार नाही अाज पाचशे चाेक रस्त्यावर उतरली अाहेत, उद्या पाच हजार उतरतली असेही गाेखले यावेळी म्हणाले. 

Web Title: hindutvavadi organizations on road to protest against snatan ban demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.